Sanjay Raut News: मोठी घडामोड! संजय राऊतांचा निकटवर्तीय शिंदेंनी फोडला?; रात्री ९.३० वाजता प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 19:05 IST2022-12-21T19:05:20+5:302022-12-21T19:05:54+5:30
Sanjay Raut, Eknath Shinde News: नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामुळे सर्व मुख्यमंत्र्यांसह सर्व नेते, मंत्री नागपुरात आहेत. तिथेच हा प्रवेश होणार आहे.

Sanjay Raut News: मोठी घडामोड! संजय राऊतांचा निकटवर्तीय शिंदेंनी फोडला?; रात्री ९.३० वाजता प्रवेश करणार
शिवसेनेचे फायरब्रँड नेते, उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे असलेले राज्यसभा खासदार संजय राऊत यांना जोरदार धक्का देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राऊतांचा निकटवर्तीय आज रात्री साडे नऊ वाजता नागपूरमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. आता हा नेता कोण यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
संजय राऊत यांच्या जवळचे काही मोजकेच नेते आहेत. यामध्ये बाळा सावंत, भाऊ चौधरी आणि बंधु सुनिल राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच नाशिकचा कोणी नेता आहे का? यावरूनही चर्चा सुरु झाली आहे.
नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामुळे सर्व मुख्यमंत्र्यांसह सर्व नेते, मंत्री नागपुरात आहेत. उद्धव ठाकरे देखील दोन दिवस नागपुरात ठाण मांडून होते. यामुळे हा नेता नेमका कोण यावर चर्चा सुरु झाली आहे. शिंदे गटाकडून या नावावर अद्याप सस्पेन्स ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, शिंदेंचे खास प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी कवितेतून सुचक ट्विट केले आहे.
सकाळच्या भोंग्याला आज
बसणार आहे झटका
बसेल पुरता आवाज
असा दाबलाय आम्ही खटका
अशी कळ उठेल की
ब्रह्मांड आठवेल
भोंगा मग दाही दिशांना
चमच्यांना पाठवेल
सांगून गेलीत मोठी माणसं
सदा सतर्क असावे
आपले जेवढे तोंड तेवढेच घास घ्यावे, असे म्हटले आहे.