शेतकऱ्यांना मोठा दिलासा, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 06:33 PM2024-07-15T18:33:49+5:302024-07-15T18:37:52+5:30
Crop Insurance: अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणी नंतर ही मुदत ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली.
मुंबई - प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज- दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणी नंतर ही मुदत ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली.
सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्याप ही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित आहे त्यामुळे पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला. तसेच असून मंत्री धनंजय मुंडे स्वतः याबाबत पाठपुरावा करत होते.
त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पिक विमा भरण्याचे मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.