खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा! बेळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 02:02 PM2023-02-08T14:02:10+5:302023-02-08T14:03:02+5:30

वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या न्यायालयात खटला दाखल

Big relief for Shiv Sena leader, MP Sanjay Raut, Belgaum court granted pre arrest bail | खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा! बेळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा! बेळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

Next

प्रकाश बेळगोजी

बेळगाव : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीच्या काळात बेळगाव येथे येऊन वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात तारखांना हजर न राहिल्यामुळे त्यांच्यावर वॉरंट बजावण्यात आला होता. दरम्यान आज, बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुढील सुनावणी ५ एप्रिल रोजी होणार आहे.

बेळगाव लाईव्हच्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत हे उपस्थित राहिले होते. त्याचवेळी निवडणुकांचा काळ होता. त्यांनी केलेल्या विधानांमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन भाषिक वर्गात तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली कलम 153 ए अन्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

खासदार संजय राऊत हे तारखांना हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र आज झालेल्या सुनावणीत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहिती ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार यांनी दिली.

संजय राऊत यांच्यासह तिघांना टिळकवाडी पोलीस स्थानकांतर्गत संजय राऊत यांच्यासह किरण ठाकूर आणि प्रकाश बेळगोजी यांना भा. दं. वि. कलम १५३ आणि ५०५ (२) नुसार गुन्हा नोंदवून समन्स बजाविण्यात आले. ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार, मारुती कामानाचे, शंकर बाळ नाईक आणि हेमराज बेंचांनावर हे या हाय प्रोफाईल खटल्याचे काम पाहात आहेत. 

Web Title: Big relief for Shiv Sena leader, MP Sanjay Raut, Belgaum court granted pre arrest bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.