Maharashtra Political Crisis: आता लक्ष्य राष्ट्रवादी? एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यातच खिंडार! शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 04:39 PM2022-08-07T16:39:52+5:302022-08-07T16:40:12+5:30

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात केलेला प्रवेश एकनाथ खडसेंसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.

big setback to eknath khadse hundreds of ncp workers join eknath shinde group in jalgaon | Maharashtra Political Crisis: आता लक्ष्य राष्ट्रवादी? एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यातच खिंडार! शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात

Maharashtra Political Crisis: आता लक्ष्य राष्ट्रवादी? एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यातच खिंडार! शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात

Next

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, राज्यभर दौरे सुरू आहेत. यातच एकनाथ शिंदे गटाला राज्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. आता मात्र, एकनाथ शिंदे गटाने आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवल्याचे चित्र असून, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. 

नुकत्याच रावेर मतदारसंघात झालेल्या ग्रामंपचायत निवडणूकीत चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, हा आनंद फारकाळ टिकला नाही. शिंदे गटात सहभागी असलेले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंना मोठा धक्का दिला आहे. नाथाभाऊंचा बालेकिल्ला असलेल्या बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

शिंदे गटात प्रवेश करुन एकनाथ खडसेंना 'राम राम'

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करुन एकनाथ खडसेंना 'राम राम' केला आहे. जळगाव जिल्हा दूध संघानंतर शिंदे गटाने एकनाथ खडसे यांना आपल्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का दिला आहे. 

दरम्यान, एकनाथ खडसेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा उमेदवारांनी विजय मिळविला होता. तर दोन दिवसांपूर्वी रावेर तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यापैकी चार ग्रामपंचायतींवर एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात झेंडा फडकावला. तत्पूर्वी, एका रात्रीत जिल्हा दूध संघाची चौकशी लावून शिंदे सरकारने गिरीश महाजन समर्थकांचे प्रशासक मंडळ नियुक्त करत एकनाथ खडसेंना धक्का दिला होता. त्याला काही दिवस उलटतायत तोवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश हा दुसरा मोठा धक्का खडसेंना देण्यात आला आहे.
 

Web Title: big setback to eknath khadse hundreds of ncp workers join eknath shinde group in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.