Maharashtra Politics: ठाकरे गटासह राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ जिल्ह्यातील पदाधिकारी शिंदे गटात; ताकद वाढतेय!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 02:39 PM2022-11-16T14:39:35+5:302022-11-16T14:40:34+5:30
Maharashtra News: राज्यभरातून समर्थन मिळत असल्यामुळे शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics:एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. शिवसेना पक्षाला पडलेले भगदाड दिवसेंदिवस विस्तारताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील केवळ शिवसेना नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधीलही नेते पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. यातच आता राज्यातील दोन जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वसंत चव्हाण यांची बोईसर आणि विक्रमगड विधानसभा क्षेत्र आणि पालघर जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला पालघर जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
पक्षातील माझ्या समर्थकांना डावलले गेले
यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलीप कोल्हे यांचा पक्षप्रवेश होत आहे. कोणत्याही अपेक्षेने शिंदे गटात जात नाही. शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, तरीही कोर कमिटीत स्थान मिळाले नाही. डावलल्यामुळे मी नाराज नव्हतो. पण, पक्षातील माझ्या समर्थकांना डावलले जात होते. त्यामुळे अखेरीस मी शिंदे गटात प्रवेश करत आहे. पक्षातील स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे दिलीप कोल्हे यांनी म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"