आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ जिल्ह्यातील शेकडो युवासेना कार्यकर्त्यांचा शिंदे गटाला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 10:20 AM2022-07-19T10:20:45+5:302022-07-19T10:21:34+5:30

युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला.

big shock to aditya thackeray hundreds of yuva sena workers in thane district support the eknath shinde group | आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ जिल्ह्यातील शेकडो युवासेना कार्यकर्त्यांचा शिंदे गटाला पाठिंबा

आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ जिल्ह्यातील शेकडो युवासेना कार्यकर्त्यांचा शिंदे गटाला पाठिंबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील शेकडो युवासैनिक आणि युवती सैनिकांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. युवा सेना सचिव आणि माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला. शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि स्व. आनंद दिघे यांची शिकवण अंगीकारून एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. आधी ठाणे त्यानंतर कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर येथील अनेक नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. भिवंडी, मुरबाड, शहापूर, वसई-विरार, पालघर या पट्ट्यातील अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हेही शिंदे यांच्या गटात सामील झाले. आता ठाणे जिल्ह्यातील युवा सेनेच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.

राज्यातील युतीचे सरकार युवक-युवती यांचे शिक्षण, रोजगार आदी प्रश्न तातडीने सोडवून त्यांना न्याय मिळवून देईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. आमदार प्रताप सरनाईक, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, पूर्वेश सरनाईक, युवासेना विस्तारक राहुल लोंढे आणि युवासेनेचे निखिल बुडजडे, विराज महामुणकर आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते.
 

Web Title: big shock to aditya thackeray hundreds of yuva sena workers in thane district support the eknath shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.