“भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण...”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 11:25 AM2023-08-24T11:25:25+5:302023-08-24T11:25:57+5:30

Uddhav Thackeray: कुणाला जायचे असेल तर खुशाल जाऊ शकता. मी खंबीर आहे. मला निवडणूक लढवायची नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

big statement of uddhav thackeray in office bearers meeting about bjp alliance patch up | “भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण...”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठे विधान

“भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण...”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठे विधान

googlenewsNext

Uddhav Thackeray: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही तयारीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे विविध विभागांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्रीवर घेत आहेत. राज्यातील विविध मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. यातच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. 

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आढावा बैठक होत आहे. या बैठकीत विदर्भातील लोकसभेच्या जागांचा आढावा घेतला जाणार आहे. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच इतर मतदारसंघावरही चर्चा होणार आहे. या बैठकीत अकोला लोकसभा मतदारसंघ वंचितसाठी सोडण्यावरही चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटात इनकमिंग सुरू झाले आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे नगर जिल्ह्यात ठाकरे गटाचे बळ वाढले असल्याची चर्चा आहे. 

भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण...

शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक मोठे विधान केल्याचे सांगितले जात आहे. मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो. पण माझ्या नितिमत्तेत बसत नव्हते. २०१४ पासून ज्यांनी फसवले त्यांच्यासोबत कसे जाणार? मी मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. पण जे मनाने फुटले त्यांना डांबून काय करणार होतो? त्यांना मी काय कमी केले होते? स्वाभिमान महत्त्वाचा होता. शिवसेनेचा दरारा कायम राखणे महत्त्वाचे होते. त्यामुळे मी कोणतीही तडजोड केली नाही. मी भाजपसोबत गेलो नाही, असे उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत म्हटल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, जुने निष्ठावंत सोडून जातात त्याचे वाईट वाटते. तुमच्या पैकी कुणाला जायचे असेल तर खुशाल जाऊ शकता. संकटे येतात आणि संकटे जातात. मी खंबीर आहे. आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत, असे सांगतानाच माझा काही स्वार्थ नाही. मला निवडणूक लढवायची नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


 

Web Title: big statement of uddhav thackeray in office bearers meeting about bjp alliance patch up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.