TET Exam: राज्यात मोठी शिक्षक भरती! टीईटी परीक्षेचा कालावधी ठरला; ठाकरे सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 05:42 PM2021-07-20T17:42:23+5:302021-07-20T17:42:53+5:30
Teacher recruitment in Maharashtra: राज्यात एकूण 40 हजारावर शिक्षकांच्या जागा रिक्त असून टप्प्या टप्प्याने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Teacher Job: गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा एकदा पास झाली की आजीवन वैधता राहणार असल्याने शिक्षक होणाऱ्या उमेदवारांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात एकूण 40 हजारावर शिक्षकांच्या जागा रिक्त असून टप्प्या टप्प्याने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत. (Maha TET Exam schedule declaired By Education Department.)
राज्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये 27 हजार, माध्यमिकमध्ये 13000 अशा 40 हजार जागा रिक्त आहेत. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून टीईटी परीक्षा घेण्यात आली नव्हती. 2018-19 मध्ये अखेरची परीक्षा झाली होती. यामुळे यंदा उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी 7 लाख उमेदवार परीक्षेला बसतात. ते यंदा तीन लाखांनी वाढण्याची शक्यता आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 8 जुलै रोजी राज्यातील 6100 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याची घोषणा केली होती. ही भरती प्रक्रिया कोरोना संकटामुळे पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केला होता. यानुसार टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.