बिग बी राज्यातील फळबागांचे ब्रँड अँम्बेसेडर
By admin | Published: June 6, 2014 10:09 AM2014-06-06T10:09:50+5:302014-06-06T12:16:56+5:30
राज्य सरकारने फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्याचा विचार सुरु केला आहे. विशेष म्हणजे बिग बींनीही या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Next
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ६ - राज्याच्या विविध भागांमधील आंबा, चिकू, कांदा, टॉमेटोच्या फळबागांमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार बिग बी अर्थात महानायक अमिताभ बच्चन फेरफटका मारताना आढळल्यास आश्चर्यचकीत होऊ नका. राज्य सरकारने फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्याचा विचार सुरु केला आहे. विशेष म्हणजे बिग बींनीही या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
कुछ दिन तो गुजारीये गुजरात मे असे सांगत गुजरात पर्यटन विभागाची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन सर्वांनीच बघितले. याचा फायदा गुजरात सरकारला झाला होता. गुजरात सरकारनंतर आता महाराष्ट्र सरकारनेही अमिताभ बच्चन यांची फळबागांचे ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. 'फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील फलोत्पादन मंत्र्यांसोबत बैठक झाली. आंबा, चिकू, टॉमेटो यासारख्या फळबागांचे प्रोमोशन करण्यासंदर्भात चर्चा केली' असे ट्विट केले आहे. फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमिताभ यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती झाल्यास राज्यातील फळबाग लागवड करणा-यांना याचा मोठा फायदा होणार हे मात्र नक्की.