corona virus-सर्वात मोठी बातमी : लोकदैवत दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 05:47 PM2020-03-17T17:47:35+5:302020-03-17T17:51:07+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज बुधवारपासून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील देवता कोल्हापुरची अंबाबाई व दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिर अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. श्री जोतिबाची चैत्र यात्राही स्थगित करण्यात आली आहे. तसेच सर्व धर्मांच्या सामुहिक प्रार्थनांवर प्रतिबंध करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केला.

The biggest news: Lokdavat canceled King Jotiba's visit to the Deccan | corona virus-सर्वात मोठी बातमी : लोकदैवत दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा स्थगित

corona virus-सर्वात मोठी बातमी : लोकदैवत दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा स्थगित

Next
ठळक मुद्देजोतिबा यात्रा स्थगित सर्व सधर्मांच्या सामुहिक प्रार्थनांवरही प्रतिबंध

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज बुधवारपासून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील देवता कोल्हापुरची अंबाबाई व दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिर अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. श्री जोतिबाची चैत्र यात्राही स्थगित करण्यात आली आहे. तसेच सर्व धर्मांच्या सामुहिक प्रार्थनांवर प्रतिबंध करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केला.

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधीक रुग्ण आढळून आले आहेत. दुसऱ्या टप्यातच याचा संसर्ग रोखण्यासाठी बुधवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्मिय व देवस्थान प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, यांच्यासह सर्व पक्षांचे आणि सर्वधर्मीय उपस्थित होते. या बैठकीत सर्वच धार्मिक प्रार्थनास्थळांवर न जाण्याचे प्रशासनाने आवाहन केले, त्याला सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली आहे.

वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. हे देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि.मी.वर आहे. या डोंगरावर प्राचीन काळापूसन प्रसिद्ध असलेले हे जोतिबाचे पुरातन मंदीर आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीतील जोतिबाचे दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यानंतर कोरोनाचा पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

 

Web Title: The biggest news: Lokdavat canceled King Jotiba's visit to the Deccan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.