बाबांची तिसरी पिढी काम करतेय हाच मोठा आनंद

By admin | Published: May 12, 2015 10:40 PM2015-05-12T22:40:29+5:302015-05-12T23:40:36+5:30

प्रकाश आमटे, मंदा आमटेंचे मत : उंबर्डेत आमटे दाम्पत्याची विशेष मुलाखत

This is the biggest pleasure of Baba's third generation | बाबांची तिसरी पिढी काम करतेय हाच मोठा आनंद

बाबांची तिसरी पिढी काम करतेय हाच मोठा आनंद

Next

वैभववाडी : सामाजिक भान ठेऊन स्वसमाधानासाठी केलेले कार्य सर्वश्रेष्ठ ठरते. आरोग्य, शिक्षणाबाबत आदीवासींमध्ये जागृती आणि विश्वास निर्माण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन बाबांची तिसरी पिढी त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करतेय. हाच आमच्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे. असे मत ज्येष्ठ समाजसेवक मॅगसेस पुरस्कारप्राप्त पदमश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे व डॉ. मंदा आमटे यांनी मंगळवारी उंबर्डे येथे व्यक्त केले.
उंबर्डे येथील सीताराम विद्यामंदिरच्या प्रांगणात आयोजित एका खास कार्यक्रमात आमटे दाम्पत्याची विशेष मुलाखत पार पडली. यावेळी माजी प्राचार्य अल्ताफ खान, सभापती वैशाली रावराणे, उपसभापती शोभा पांचाळ, माजी सभापती माई सरवणकर, सुवर्णा संसारे, अनंत सरवणकर, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, बंड्या मांजरेकर, शुभांगी पवार, सरपंच श्रावणी खाडे, द. गो. मुद्रस, शरपुद्दीन बोबडे आदी उपस्थित होते.
डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, बाबांनी सरकारची जबाबदारी खांद्यावर घेत कुष्ठरोग्यांसाठी आनंदवनाची निर्मिती करून त्यांची आजन्म सेवा केली. सुरूवातीला त्यांच्या वाट्याला हेटाळणी आली. मात्र, त्याच समाजाने नंतर त्यांना प्रतिष्ठा दिली. भामरागडच्या सहलीतील एका मुक्कामात बाबांनी आदीवासींच्या सामाजिक पुनर्वसनासाठी शब्द टाकला. तेव्हा मी म्हणालो, तुम्ही सुरूवात करा मी ते काम पुढे नेईल. तेथूनच आमचे काम सुरू झाले. डॉ. आमटे पुढे म्हणाले, मांत्रिक बुवाबाजीच्या पाशातून आदीवासींना सोडविण्याचे शिवधनुष्य उचलणे तितके सोपे नव्हते. त्यामुळे औषध काय असते याची यत्किंचितही कल्पना नसणाऱ्या आदीवासींनाह औषधोपचाराची सवय लावून त्यांच्यात औषधोपचारांविषयी विश्वास निर्माण करून मांत्रिकांच्या पाशातून सोडविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले.
आदीवासींमध्ये प्रतिभाशक्ती कमी असली तरी त्यांच्यातील सहन शक्ती प्रचंड टोकाची आहे. शिक्षणाबाबतही प्रचंड मेहनत घेऊन विश्वास निर्माण करावा लागला. मराठी शब्द कोशांशी त्यांचा संबंध नव्हता. शाळेतील बंदीस्त जीव त्यांना रूचत नव्हते. त्यामुळे वस्तुशी सांगड घालून काम करावे लागले. त्याचा आता परिणाम खूपच चांगला दिसून येत आहे. ते पुढे म्हणाले, संकटाशी सामना करण्याचे साहस आमच्यामध्ये मधमाशांच्या हल्ल्याने आले. पाळीव आणि जंगली प्राण्यांना एकमेकांचा सहवास घडवून त्यांच्यातील प्रेम आणि हिंस्त्रपणा यातील दरी नष्ट करण्याचे काम करताना दोन पायांच्या प्राण्यांपेक्षा चार पायांच्या प्राण्यांचा अनुभव अधिक सुखद आणि तितकाच चांगला आहे. जीवंत माणसाच्या आयुष्यावर चित्रपट $ि$िनघणे आणि तो चांगला चालणे हा आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. (प्रतिनिधी)


बाबा आमटेंना भारतरत्न द्यावे : खान
थोर समाजसेवक स्व. बाबा आमटेंनी समाजातील उपेक्षीत घटक समजल्या जाणाऱ्या कुष्ठरोग्यांसाठी काम करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांना नवे आयुष्य जगण्याची दृष्टी दिली. त्यामुळे ते एक बहुमल्य व्यक्तीमत्व होते. त्यांच्या महान कार्याबद्दल भारत सरकारने सर्वश्रेष्ठ भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा होता. अजूनही ते शक्य आहे. आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारने तरी बाबांना भारत रत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करायला हवा, असे मत माजी प्राचार्य अल्ताफ खान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
सामाजिक कार्याचा वसा पुढे चालतोय....
डॉ. मंदा आमटे म्हणाल्या, सार्वजनिक जिवनाची सवय नव्हती. मात्र, प्रकाशसोबत काम करू लागल्यावर त्याची सवय झाली आणि आपण करित असलेल्या कामाचे समाधानही खूप मोठे आहे. वेगळ काही तरी करावे लागणार याची जाणीव झाल्याने माझ्या घरातून आमच्या लग्नाला विरोध झाला. मात्र, आई-वडील आनंदवनात जाऊन आल्यावर त्यांचा विरोध मावळला. आदीवासींना सोबत घेऊन आज आमची मुले बाबांच्या सामाजिक कार्याचा वारसा चालवताहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो.

Web Title: This is the biggest pleasure of Baba's third generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.