बुलडाण्यात देशातील सर्वांत मोठा सीड हब
By admin | Published: February 17, 2016 03:16 AM2016-02-17T03:16:24+5:302016-02-17T03:16:24+5:30
पेप्सिको इंडिया ही नामवंत कंपनी महाराष्ट्रात फळ प्रक्रिया उद्योग सुरू करणार असून त्यासाठीच्या सामंजस्य करारावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला
मुंबई : पेप्सिको इंडिया ही नामवंत कंपनी महाराष्ट्रात फळ प्रक्रिया उद्योग सुरू करणार असून त्यासाठीच्या सामंजस्य करारावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. अमेरिकेची जगप्रसिद्ध मोन्सेन्टो कंपनी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे देशातील सर्वात मोठे सीड हब उभारेल अशी घोषणाही यावेळी करण्यात आली.
अमेरिकेतील ३० नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळाने मेक इन इंडिया सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची
इच्छा व्यक्त केली. यावेळी उद्योग
मंत्री सुभाष देसाई आणि अमेरिकेचे कौन्सुलेट जनरल टॉम वायडा
उपस्थित होते.
यावेळी कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन व पेप्सिको इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. शिवकुमार यांनी महाराष्ट्रात फळप्रक्रि या उद्योग सुरु करण्यासंदर्भात सामंजस्य करार
केला. या करारानुसार महाराष्ट्रातील संत्रा, मोसंबी फळांवर प्रक्रि या
करु न त्याचा रस बनविण्याचा
प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. त्याची जागा लवकरच निश्चित केली जाईल. (विशेष प्रतिनिधी)