वांगणीच्या बाजारपेठेत आज डोळे बांधून चालवणार बाइक
By admin | Published: May 14, 2017 02:46 AM2017-05-14T02:46:35+5:302017-05-14T02:46:35+5:30
वांगणीच्या बाजारपेठेत, भर गर्दीत संध्याकाळी ५.३० वाजता डोळे बांधून मोटारसायकल चालवण्याचा चित्तथरारक प्रयोग रविवारी रंगणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वांगणीच्या बाजारपेठेत, भर गर्दीत संध्याकाळी ५.३० वाजता डोळे बांधून मोटारसायकल चालवण्याचा चित्तथरारक प्रयोग रविवारी रंगणार आहे. सुट्टीच्या काळात बच्चेकंपनीला आणि त्यांच्या पालकांना मेजवानी देण्यासाठी जादुगार रघुवीर हा प्रयोग करणार आहेत.
जितेंद्र रघुवीर यांचे आजोबा, वडील हेही जादुगार होते. त्यांच्या तीन पिढ्या जादुचे प्रयोग दाखवून मनोरंजन करीत आहेत आणि वांगणीतील त्यांचा प्रयोग १५ हजार १३८ वा आहे. रगुवीर हे डोळे बांधून मोटारसायकल चालवत असले, तरी त्याचे स्वागत करणाऱ्यांना ते रस्त्याच्या मधोमध उभे रहायला सांगतात आणि असा सत्कार स्वीकारत, डोळे बांधून मोटारसायकल चालवत ते पुढे जातात. तोच प्रयोग ते वांगणीच्या बाजारपेठेपासून ज्ञानेश्वर मंगल कार्यालयापर्यंत करणार आहेत.
स्वत: इंजिनिअर असल्याने रघुवीर यांनी जादुच्या प्रयोगत तंत्राचा वापर सुरू केला आहे.
>माणसाचे दोन तुकडे करण्याच्या जादूला प्रतिसाद
जादुच्या प्रयोगांत हातचलाखीला महत्त्व असते. त्याचबोरबर माणसाचे दोन तुकडे करणे, प्रेक्षकांतील एखादी मुलगी अधांतरी ठेवणे, मानेतून तलवार आरपार घालवणे, नोटांचा पाऊस पाडणे, प्लाइंग बॉक्स अशा चिच्वेधक प्रयोगांचा समावेश ते आपल्या संचासोबत करणार आहेत. तसेच भारतीय जादुंसोबत अरेबिक, अमेरिकन, चिनी, जपानी, युरोपीयन जादुंचाही समावेश करत ते आपल्या हस्तकौशल्याचे प्रात्यक्षिक दाखवतील.