बाइक रॅली ‘नॉनस्टॉप’ !

By Admin | Published: November 4, 2016 05:25 AM2016-11-04T05:25:36+5:302016-11-04T05:25:36+5:30

मराठा क्रांती मूक मोर्चातर्फे मुंबईमध्ये रविवारी निघणाऱ्या बाइक रॅलीची नियोजन बैठक गुरुवारी वडाळ््यातील भारतीय क्रीडा मंदिरमध्ये पार पडली.

Bike Rally 'Nonstop'! | बाइक रॅली ‘नॉनस्टॉप’ !

बाइक रॅली ‘नॉनस्टॉप’ !

googlenewsNext


मुंबई : मराठा क्रांती मूक मोर्चातर्फे मुंबईमध्ये रविवारी निघणाऱ्या बाइक रॅलीची नियोजन बैठक गुरुवारी वडाळ््यातील भारतीय क्रीडा मंदिरमध्ये पार पडली. या बैठकीत सर्वानुमते रविवारी, ६ नोव्हेंबरला निघणारी बाइक रॅली नॉनस्टॉप काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
समितीचे विरेंद्र पवार यांनी सांगितले की, मैदानातून बाहेर पडणे जिकीरीचे ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे बाइक रॅलीला सोमय्या मैदानाजवळच्या मोनो रेल्वे स्थानकामागील बाजूने सुरुवात होईल. पहाटेपासून समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी मार्गदर्शनासाठी हजर असतील. पूर्व द्रूतगती मार्गावर एकामागोमाग बाइक उभ्या राहतील. त्यात सुरुवातील महिला चालक, त्यामागे महिला चालक व पुरूष सहचालक आणि शेवटी पुरूष चालक अशी रॅलीची रचना असेल.
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाखाली मोकळ््या जागेत काही कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व कोपर्डी पीडितेचा श्रद्धांजली स्तंभ उभारतील. यावेळी रॅली सुरूच असेल. दोन तासांत रॅली पार पाडण्याचा मानस आहे.
>अशी असेल बाइक रॅली
सायन सर्कलहून सायन रुग्णालय, माटुंगा सर्कल, दादर, परळ, लालबाग, भायखळा या विभागांतून जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून रॅली मार्गक्रमण करेल.
भायखळ््यापर्यंत एकाही उड्डाणपुलावरून रॅली जाणार नाही. सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व उड्डाणपुलांखालून जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.केवळ जे.जे. उड्डाणपुलाचा वापर केला जाईल. या उड्डाणपुलाखाली मराठा समाजाची संख्या फारच तुरळक आहे. त्यामुळे जे.जे. उड्डाणपूल चढून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्थानकासमोरून यू टर्न घेऊन रॅली माघारी वळेल.
सीएसटी स्थानकाकडून यू टर्न घेतलेली रॅली जे.जे. उड्डाणपूल चढून भायखळ््याच्या खडा पारशी जंक्शनपर्यंत आल्यावर विसर्जित होईल.

Web Title: Bike Rally 'Nonstop'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.