मुसळधार पावसाने बळीराजा धास्तावला
By admin | Published: September 21, 2016 03:42 AM2016-09-21T03:42:20+5:302016-09-21T03:42:20+5:30
पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात उत्तम पाऊस पडल्याने भात शेती चांगली फुलली आहे पीक दर्जेदार आले आहे.
मनोर : पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात उत्तम पाऊस पडल्याने भात शेती चांगली फुलली आहे पीक दर्जेदार आले आहे. परंतु गेल्या चारपाच दिवसापासून पुन्हा मुसळधार पाऊस पडत असल्याने बळीराजा धास्तावला आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय? अशी भीती बळीराला वाटते आहे.
यंदा पावसाने सुरूवात चांगली केली. भात शेतीला लागणारा पाऊस टप्प्या टप्प्याने पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही आपल्या शेतात विविध जातीचे भात बियाणे लावले सर्वत्र चांगले पिक आले आहे. काही भागात कणसेही दर्जेदार आले आहेत. मात्र गेल्या चार-पाच दिवसापसून पुन्हा पावसाने हजेरी लावली असल्याने काही भागामध्ये लोंब्या वाकु लागल्याने भात शेतीचे नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)