अब्जाधीश उमेदवार पराग शहा विजयी

By admin | Published: February 24, 2017 05:19 AM2017-02-24T05:19:12+5:302017-02-24T05:19:12+5:30

गेली कित्येक वर्षे निर्विवादपणे नगरसेवक पद राखण्यात यश

Billionaire candidate Parag Shah won | अब्जाधीश उमेदवार पराग शहा विजयी

अब्जाधीश उमेदवार पराग शहा विजयी

Next

 दीप्ती देशमुख / मुंबई
गेली कित्येक वर्षे निर्विवादपणे नगरसेवक पद राखण्यात यश मिळालेल्या काँग्रेसच्या प्रवीण छेडांना, यंदाच्या निवडणुकीत भाजपाचे अब्जाधीश पराग शहा यांच्याकडून पराभवाची चव चाखावी लागली. छेडा यांच्या पराभवाने काँग्रेसने घाटकोपरमधील एकुलती एक सीट गमवली. घाटकोपर पूर्व व पश्चिममध्ये उभ्या राहिलेल्या काँग्रेसच्या दहा उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला यश मिळालेले नाही.
एन वॉर्डमध्ये गुजराती बहुसंख्य असलेल्या प्रभागातून काँग्रेसच्या प्रवीण छेडा यांना टक्कर देण्यासाठी भाजपाने नवी खेळी करत, अब्जाधीश पराग शहा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. एका कंपनीचे प्रमोटर असलेले पराग शहा यांची एकूण संपत्ती ६८९ कोटी ९५लाख दोन हजार ३२७ कोटी रुपये आहे. या संपत्तीमुळे ते निवडणुकीच्या दरम्यान सतत चर्चेत राहिले.
प्पराग शहा यांनी अखेरीस २,७२४ मतांची आघाडी घेत छेडांना पराभूत केले. पराग शहा यांना एकूण १४,५१८ मते मिळाली, तर प्रवीण छेडा यांना ११,७९४ मते मिळाली. या प्रभागात सोमय्या महाविद्यालय, गारोडिया नगर, ओएनजीसी कॉलनी आणि राजावाडी रुग्णालयाच्या भोवतालच्या परिसराचा समावेश आहे.
पराग शहा यांनी आपल्या विजयाचे श्रेय भाजपाला दिले आहे."‘भाजपाने माझ्यावर विश्वास ठेवून तिकीट दिले. लोकांनीही माझ्यावर विश्वास ठेवला. आता लोकांची सेवा करायची आहे,’ असे म्हणत पराग शहा यांनी प्रवीण छेडा यांच्याबद्दल प्रतिक्रिया देणे टाळले." 

Web Title: Billionaire candidate Parag Shah won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.