कंपनी विक्रीतून मुंबईतील बंधू झाले 'अब्जाधीश'

By Admin | Published: August 23, 2016 01:48 PM2016-08-23T13:48:18+5:302016-08-23T14:01:04+5:30

मुंबईतील दोन बंधु अॅड टेक कंपनी विक्रीच्या व्यवहारातून अब्जाधीश बनले आहेत. महत्वाचं म्हणजे हा व्यवहार गुगलच्या अॅडमोब आणि टिवटरच्या मोपबच्या खरेदी व्यवहारापेक्षा मोठा आहे.

'Billionaire' from Mumbai Company | कंपनी विक्रीतून मुंबईतील बंधू झाले 'अब्जाधीश'

कंपनी विक्रीतून मुंबईतील बंधू झाले 'अब्जाधीश'

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २३ - मुंबईतील दोन बंधु अॅड टेक कंपनी विक्रीच्या व्यवहारातून अब्जाधीश बनले आहेत. महत्वाचं म्हणजे हा व्यवहार गुगलच्या अॅडमोब आणि टि्वटरच्या मोपबच्या खरेदी व्यवहारापेक्षा मोठा आहे. दिव्यांक आणि भाविन तुराखिया या बंधुंनी त्यांची मिडीया नेट ही अॅडव्हटायजिंग टेक्नोलॉजी कंपनी ९०० कोटी डॉलर्सना विकली. 
 
चीनच्या मिटीनो कम्युनिकेशन टेक्नोलॉजीने ही कंपनी विकत घेतली. आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे त्यांनी मिडीया नेट ही कंपनी विकली. अॅड टेक इंडस्ट्रीतला हा आजवरचा सर्वात मोठा व्यवहार असून,  गुगलने अॅडमोब कंपनी ७५० कोटी डॉलर्स मोजून तर, टि्वटरने मोपब ३५० कोटी डॉलर्सना विकत घेतली होती. त्यापेक्षा हा मोठा व्यवहार आहे. 
 
दिव्यांक आणि भाविन दोघे जुहूमध्ये लहानाचे मोठे झाले. मिडीया नेटसह जगातील अॅड टेक कंपन्या आज अडचणींचा सामना करत आहे. बाजारात मंदी असताना तुराखिया बंधु इतक्या मोठया किंमतीला कंपनीची विक्री करण्यात यशस्वी ठरले.
 
दिव्यांक आणि भाविनने बांद्रयाच्या आर्य विद्या मंदिर शाळेतून शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी भारतीय कंपन्यांना वेबसाईट बनवण्यात मदत करण्यास सुरुवात केली. दिव्यांकने नरसी मोनजी तर, भाविनने सिडनॅम कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. 
मिडीया नेटला अमेरिकन बाजारातून ९० टक्के उत्पन्न मिळते. कॅनडा, युकेमधून दहा टक्के उत्पन्न मिळते. चीन जगातील दुसरी सर्वात मोठी ऑनलाइन अॅडव्हटायजिंगची बाजारपेठ आहे. 
 

Web Title: 'Billionaire' from Mumbai Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.