विद्याथ्र्याची घेणार बायोमेट्रिक हजेरी

By admin | Published: August 7, 2014 11:19 PM2014-08-07T23:19:49+5:302014-08-07T23:19:49+5:30

दररोज महाविद्यालयात आले नाही तरी चालेल.., केवळ परीक्षा देण्यासाठी या .., तुम्हाला बी.एड्., एम.एड्.अभ्यासक्रमाची पदवी देण्याची व्यवस्था केली जाईल..,

Biometric attendance to take the music | विद्याथ्र्याची घेणार बायोमेट्रिक हजेरी

विद्याथ्र्याची घेणार बायोमेट्रिक हजेरी

Next
>पुणो: दररोज महाविद्यालयात आले नाही तरी चालेल.., केवळ परीक्षा देण्यासाठी या .., तुम्हाला  बी.एड्., एम.एड्.अभ्यासक्रमाची पदवी देण्याची व्यवस्था केली जाईल.., अशी प्रलोभने दाखवून पुणो विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदव्यांची अक्षरश: विक्री करणा:या शिक्षण संस्थाच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पुणो विद्यापीठाने धोरणात्मक निर्णय घेतला असून बी.एड., एम.एड च्या विद्याथ्र्याची आता बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे.  
पुणो विद्यापीठाशी संलग्न व  शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमध्ये बी.एड्. आणि एम.एड्.अभ्यासक्रमास प्रवेश घेणा:या विद्याथ्र्यानी दररोज महाविद्यालयात येणो आवश्यक आहे. परंतु, काही महाविद्यालयांकडून विद्याथ्र्याना रोज हजर राहण्यास सूट दिली जात असल्याचे दिसून येत होते. त्याबदल्यात या विद्याथ्र्याना विना अनुदानित अभ्यासक्रमास प्रवेश देवून सुमारे 40 हजार रुपये शुल्क घेतले जात असल्याची माहितीही समोर येत होती. त्यामुळे विद्याथ्र्याची बायोमेट्रिक हजेरी घ्यावी, असे आदेश  शिक्षणशास्त्र विद्याशाखेतर्फे दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
 
बायोमेट्रिक हजेरीची जबाबदारी संबंधित प्राचार्याची असणार आहे. यामध्ये गैरप्रकार केल्याचे आढळून आले तर संबंधित प्राचार्यावरच फसवणूकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच ज्या विद्याथ्र्याची 80 टक्के हजेरी भरणार नाही त्यांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 114 बी.एड्. व 23 एम.एड्. महाविद्यालयांमधील सुमारे15 हजार विद्याथ्र्याची हजेरी  बायोमेट्रिक पध्दतीने घेतली जाणार आहे.
-डॉ. संजीव सोनवणो, 
विद्याशाखा अधिष्ठाता, पुणो विद्यापीठ

Web Title: Biometric attendance to take the music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.