बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स व्यावसायाभिमुख होणार

By Admin | Published: June 29, 2016 02:05 AM2016-06-29T02:05:42+5:302016-06-29T02:05:42+5:30

बीएससी ‘बायोटेक्नोलॉजी’ आणि ‘कॉम्प्युटर सायन्स’ या दोन्ही विषयांचे अभ्यासक्रम बदलण्यात आले आहेत.

Biotechnology, computer science will be business-oriented | बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स व्यावसायाभिमुख होणार

बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स व्यावसायाभिमुख होणार

googlenewsNext


मुंबई : बीएससी ‘बायोटेक्नोलॉजी’ आणि ‘कॉम्प्युटर सायन्स’ या दोन्ही विषयांचे अभ्यासक्रम बदलण्यात आले आहेत. त्यांना स्वतंत्र ओळख मिळणार असून, त्याला विद्वत परिषदेत मंजुरी मिळाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बीएससी ‘बायोटेक्नोलॉजी’ आणि ‘कॉम्प्युटर सायन्स’ या दोन अभ्यासक्रमांना आता स्वतंत्र ओळख मिळणार आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांची श्रेयांकधारित पुनर्मांडणी व्हावी, असा विचार सुरू होता. शुक्रवारी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत या ठरावाला मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही विषयांची मांडणी बदलल्यामुळे हा अभ्यासक्रम अधिक व्यावसायाभिमुख होणार आहे, यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास विद्यापीठाने व्यक्त केला आहे.
या विषयांसाठी मूलभूत विज्ञान शिकणे आवश्यक होते. त्यामुळे त्याची व्यावसायिक मागणी कमी होत होती. नवीन धोरणामुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यासक्रम शिकता येणार असून, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रासारखीच या विषयांना मागणी येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.

Web Title: Biotechnology, computer science will be business-oriented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.