ट्रेनमध्ये २०२२ पर्यंत बायोटॉयलेट्स
By admin | Published: March 29, 2017 03:37 AM2017-03-29T03:37:07+5:302017-03-29T03:37:07+5:30
भारतातील सर्व रेल्वेत २०२२ पर्यंत बायोटॉयलेट्स लावले जातील, असे रेल्वे मंत्रालयातर्फे हरीत लवादासमोर निवेदन
Next
अलिबाग : भारतातील सर्व रेल्वेत २०२२ पर्यंत बायोटॉयलेट्स लावले जातील, असे रेल्वे मंत्रालयातर्फे हरीत लवादासमोर निवेदन देऊन सांगितले आहे. भारतीय रेल्वेमध्ये शौचालयाची व्यवस्था असली तरीही रेल्वे रुळांवर विष्ठा टाकली जाते. त्यामुळे आरोग्य तसेच पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यांत ‘बायोटॉयलेट्स’ लाववेत, अशी मागणी हरीत लवादाकडे करण्यात आली आहे. याचिकेवरील सुनावणी निर्णायक टप्प्यावर आहे. या सुनावणीदरम्यान शुक्रवारी हे निवेदन रेल्वे मंत्रालयाने दिल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी दिली. (प्रतिनिधी)