धोक्याची घंटा! महाराष्ट्रात आज एका दिवसात २३८ पक्षी दगावले; आतापर्यंत २,०९६ पक्ष्यांचा मृत्यू
By मोरेश्वर येरम | Published: January 13, 2021 06:03 PM2021-01-13T18:03:38+5:302021-01-13T18:08:43+5:30
राज्याच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकूण २३८ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई
महाराष्ट्रावरील 'बर्ड फ्लू'चं संकट दिवसेंदिवस आणखी गडद होताना दिसत आहे. राज्यात आज एका दिवसात तब्बल २३८ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
राज्याच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकूण २३८ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जानेवारीपासून ते आतापर्यंत एकूण २,०९६ पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
238 birds died in the state today, samples sent for testing.
— ANI (@ANI) January 13, 2021
Total 2,096 bird deaths reported in the state from 8 January till now: Animal Husbandry Department, Maharashtra
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच पशुसंवर्धन व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. बर्ड फ्लूला अटकाव करण्यासाठी अलर्ट मोडवर राहून काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यात मुंबई, ठाणे, परभणी, दापोली, बीड, अकोला, लातूर, गोंदिया आणि चंद्रपूर भागातील पक्ष्यांचे नमूने हे बर्ड फ्लू संसर्गाचे पॉझिटिव्ह आढळले आहेत.
परभणी 'हॉटस्पॉट'
राज्यात परभणी तालुक्यात सर्वाधिक पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकट्या परभणी तालुक्यात ८०० कोंबड्या बर्ड फ्लूमुळे दगावल्या आहेत. परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने मुरुंबा येथील पोल्ट्री फार्मध्ये जाऊन कोंबड्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत.