जगभरातून भारतात येणाऱ्या पक्ष्यांना आवडे महाराष्ट्र! पक्षी राज्यात नेमके कुठे - कुठे थांबतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 09:42 AM2022-11-13T09:42:35+5:302022-11-13T09:44:14+5:30

Wild life : मध्य आशियाई उड्डाण मार्गाद्वारे प्रवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी महाराष्ट्रात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या पाणथळ जागा आहेत.

Birds coming to India from all over the world love Maharashtra! Where exactly do birds stop in the state? | जगभरातून भारतात येणाऱ्या पक्ष्यांना आवडे महाराष्ट्र! पक्षी राज्यात नेमके कुठे - कुठे थांबतात?

जगभरातून भारतात येणाऱ्या पक्ष्यांना आवडे महाराष्ट्र! पक्षी राज्यात नेमके कुठे - कुठे थांबतात?

googlenewsNext

मुंबई : मध्य आशियाई उड्डाण मार्गाद्वारे प्रवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी महाराष्ट्रात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या पाणथळ जागा असून, या मार्गाचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील सहा पाणथळ प्रदेशांमध्ये ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान करण्यात आलेल्या पक्षी सर्वेक्षणात १८ पाणपक्षी कुटुंबातील एकूण ११२ पाणपक्षी प्रजातींची नोंद झाली आहे. पक्ष्यांना आवडे महाराष्ट्र असेच हे चित्र आहे.  

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे ‘मध्य आशियाई उड्डाण मार्ग : महाराष्ट्रातील पक्षी शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशात स्थलांतरित पाणपक्ष्यांची स्थिती स्पष्ट करणे’ हा प्रकल्प राबविला जात आहे. नुकताच त्यांनी पहिला वार्षिक अहवाल (जुलै २०२१-जून २०२२) कांदळवन प्रतिष्ठानला सादर केला. मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनने यासाठी बीएनएचएसला २.७७ कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य केले आहे, अशी माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक वीरेंद्र तिवारी यांनी दिली.

पक्षी उड्डाण मार्ग वापरतात; कारण...
 प्रजनन, विश्रांतीचे ठिकाण आणि हिवाळ्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी पक्षी उड्डाण मार्ग वापरतात.
 कन्व्हेंशन ऑन मायगेट्री स्पेसिसने जगभरात नऊ स्थलांतरित उड्डाण मार्ग दर्शविले आहेत. त्यापैकी एक मध्य आशियाई उड्डाण मार्ग आहे. 
 ज्यामध्ये ३० राष्ट्रांमधून स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांचे मार्ग समाविष्ट आहेत. त्यातील बहुतांशी मार्ग भारतामधून जातात.

अभ्यास कशासाठी?
स्थलांतरित पाणपक्ष्यांचा अधिवास अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला.

उजनी धरण 
पहिल्या क्रमांकावर 
एप्रिल २०२२ मध्ये उजनी धरणातून सर्वाधिक ५८ पाणपक्षी प्रजातींची विविधता आणि सर्वाधिक २०,९७७ पाणपक्ष्यांची नोंद झाली.

कसे केले सर्वेक्षण  
बीएनएचएसने बर्ड मॉनिटरिंग सर्व्हे, बर्ड ट्रॅपिंग, बर्ड रिंगिंग आणि कलर बँडिंग असे विविध प्रकारे सर्वेक्षण केले आहे. 

सहा पाणथळ जागांवर प्रदूषण 
शेतीचे वाहून जाणारे पाणी, सांडपाणी आणि प्रदूषित पाणी यामुळे होणारे जलप्रदूषण हे सर्व सहा पाणथळ जागांवर आढळल्याचे हा अभ्यास म्हणतो.

Web Title: Birds coming to India from all over the world love Maharashtra! Where exactly do birds stop in the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.