पक्षीगणना: अहमदनगरात ११५ पेक्षा अधिक प्रजातींच्या ६६४४९ पक्ष्याची नोंद

By admin | Published: March 19, 2017 03:05 PM2017-03-19T15:05:12+5:302017-03-19T15:13:19+5:30

पक्षीमित्र संघटनांच्यावतीने जिल्ह्यातील चौदा तालुक्यात २४० ठिकाणी केलेल्या पक्षीगणना मोहिमेत ११५ पेक्षा अधीक प्रजातीचे एकूण ६६४४९ पक्षी आढळून आले़

Birds count: 6,644 bird species recorded in more than 115 species of Ahmednagar | पक्षीगणना: अहमदनगरात ११५ पेक्षा अधिक प्रजातींच्या ६६४४९ पक्ष्याची नोंद

पक्षीगणना: अहमदनगरात ११५ पेक्षा अधिक प्रजातींच्या ६६४४९ पक्ष्याची नोंद

Next

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 19 : विविध पक्षीमित्र संघटनांच्या वतीने जिल्ह्यातील चौदा तालुक्यात २४० ठिकाणी केलेल्या पक्षीगणना मोहिमेत ११५ पेक्षा अधीक प्रजातीचे एकूण ६६४४९ पक्षी आढळून आले. यामध्ये गेल्या चार ते पाच वर्षांत जिल्ह्यात पाठ फिरविलेल्या रोहित, करकोचा, बदक, हंस, चमचा अशा परदेशी पक्ष्यांचेही वास्तव्य आढळून आले आहे तसेच परदेशातून येणाऱ्या भोरडी या पक्ष्यांची यावर्षी सर्वाधिक १९९७७ इतकी नोंद झाली आहे. 
पक्षीअभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी ५० प्रौढ निरीक्षकांसह ७७३ शालेय विद्यार्थ्यांनी ही पक्षीगणना केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाथर्डी तालुक्यातुन या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. या तालुक्यात १७ प्रौढ निरीक्षकांसह २९४ विद्यार्थ्यांनी १०२ ठिकाणी पक्षीगणना केली. गेल्या वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या तलावांत अजूनही पाणीसाठा असल्याने स्थलांतरित व रहिवासी अशा सर्वच प्रकारच्या पक्ष्यांच्या संख्येत यावर्षी वाढ झाल्याचे दिसून आले. पक्षीगणनेत चंद्रकांत उदागे, स्नेहा ढाकणे, डॉ.नरेंद्र पायघन, वाजीद सय्यद, शशी ञिभूवन, ह्रषीकेश गावडे, सुधीर दरेकर, बाळासाहेब डोंगरे, विजय राऊत, अंकुश झिंजे, रावसाहेब कासार, गोकूळ नेहे, ज्योती जाधव, संदीप राठोड, सचिन शिंदे, विकास सातपुते, नम्रता सातपुते, रामेश्वर लोटके, देवेंद्र अंबेटकर, जतीन चव्हाण, ज्योती धाकतोडे, शाहीद शेख आदी पक्षीनिरिक्षक सहभागी झाले होते. सातपुते यांच्यासह शिवकुमार वाघुंबरे,डॉ.अशोक कराळे,अनमोल होन,महेश फलके ,चंद्रकांत उदागे यांनी जिल्हाभर फिरून छायाचिञण केले.

नवनी पक्षी आढळले
यावर्षी पक्षीगणनेत परदेशी पक्ष्यांबरोबर पिवळा माशीमार, छोटा कंठेरी चिखल्या, तलवार बदक, शिपाई बुलबुल, पांढरा शराटी, मुग्धबलाक, तोई पोपट अशा अनेक नवीन पक्ष्यांची नोंद प्रथमच जिल्ह्याच्या झाली. राज्यात नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या रेडलिस्टमध्ये घोषित केलेल्या कांडेसर (पांढ-या मानेचा करकोचा) या पक्ष्यांची नोंदही जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पाणथळ भागात झाली़ पक्ष्यांचे संगोपन व संवर्धन होणे गरजेचे असल्याचे मत पक्षीअभ्यासक जयराम सातपुते यांनी व्यक्त केले.
 

Web Title: Birds count: 6,644 bird species recorded in more than 115 species of Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.