पक्ष्यांची नोंद शास्त्रीय पद्धतीने; बीएनएचएसचा पुढाकार

By Admin | Published: April 11, 2017 03:07 AM2017-04-11T03:07:56+5:302017-04-11T03:07:56+5:30

हिवाळ््यात बरेच पक्षी स्थलांतर करतात, त्या वेळी अनेक पक्षीमित्र पक्ष्यांच्या नोंदी ठेवतात. सामान्यपणे दिसणाऱ्या पक्ष्यांवर सहजा कोणी लक्ष देत नाही.

Bird's entry in classical way; BNHS Initiative | पक्ष्यांची नोंद शास्त्रीय पद्धतीने; बीएनएचएसचा पुढाकार

पक्ष्यांची नोंद शास्त्रीय पद्धतीने; बीएनएचएसचा पुढाकार

googlenewsNext

मुंबई : हिवाळ््यात बरेच पक्षी स्थलांतर करतात, त्या वेळी अनेक पक्षीमित्र पक्ष्यांच्या नोंदी ठेवतात. सामान्यपणे दिसणाऱ्या पक्ष्यांवर सहजा कोणी लक्ष देत नाही. मात्र, आता या पक्ष्यांचीदेखील नोंद केली जावी, यासाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस)ने महाराष्ट्रामध्ये Common Bird Monitoring Programme सुरू केलेला आहे, तसेच बीएनएचएस राज्यातील जास्तीत जास्त संस्थेच्या मदतीने सर्वसामान्य आढळणाऱ्या पक्ष्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणार आहे.
पक्ष्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास कसा करावा? याबाबत बीएनएचएसने सांगितले की, सर्वेक्षण वर्षातून तीन वेळा केले जात असून, जी. आय. एस. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात ग्रीड टाकण्यात आले आहे. प्रत्येक ग्रीड टू इन टू किलोमीटरचे असून, ट्रान्सेक्ट लाइन ही प्रणाली वापरून अभ्यास केला जाणार आहे. सर्वेक्षण केल्याने आपल्या लक्षात येईल की, आपल्याकडे कोणते पक्षी जास्त आणि कमी आहेत. त्यानंतर, त्यांच्या संवर्धनासाठीदेखील उपाययोजना करण्यात येतील. जेणेकरून, परिसरातील पक्ष्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)

ग्रीडची निवड कशी कराल?
ग्रीड निवड करण्यासाठी ज्या भागात पक्षी निरीक्षण करायचे आहे. त्या भागाचे गुगल अर्थ लोकेशन n.dudne@bnhs.org या ईमेलवर पाठवावेत.
पाठवल्यानंतर टू इन टू किलोमीटरचा ग्रीड पाठवण्यात येईल. त्या ग्रीडमध्ये लाइन ट्रान्सेकट शास्त्रीय पद्धतीने पक्षीगणना करायची आहे.

Web Title: Bird's entry in classical way; BNHS Initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.