भारत-इस्त्राइल शैक्षणिक भागीदारीमुळे नवीन थिंक टँकचा जन्म

By admin | Published: March 31, 2017 06:35 PM2017-03-31T18:35:00+5:302017-03-31T18:35:00+5:30

मुंबई विद्यापीठामध्ये गेट वे हाऊसच्या वतीने भारत आणि इस्त्रायली शिक्षणप्रेमींसाठी एकदिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं

The birth of a new think tank due to Indo-Israel Education Partnership | भारत-इस्त्राइल शैक्षणिक भागीदारीमुळे नवीन थिंक टँकचा जन्म

भारत-इस्त्राइल शैक्षणिक भागीदारीमुळे नवीन थिंक टँकचा जन्म

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - मुंबई विद्यापीठामध्ये गेट वे हाऊसच्या वतीने भारत आणि इस्त्रायली शिक्षणप्रेमींसाठी एकदिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रामध्ये भारत आणि इस्त्रायलमधील मीडिया, जनसंपर्क यांची भागीदारी आणि शिक्षणसंस्थांचे महत्त्व याबाबत विचार करण्यात आला. या चर्चासत्राचे फलित म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये भारत-इस्त्राईल अभ्यासकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. हे नवीन अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ आणि इस्त्राईलमधील तेल अवीव विद्यापीठाशी जोडण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी जून-जुलै महिन्यात इस्त्राईलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या अभ्यासकेंद्राला महत्त्व आले‌ आहे.

गेट वे हाऊसचे कार्यकारी संचालक मनजित कृपलानी यावेळी म्हणाल्या, शिक्षणक्षेत्रामध्ये आता थिंक टँकची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. केवळ शिक्षणक्षेत्राशी जोडल्या गेलेल्या थिंक टँकची मक्तेदारी आता संपुष्टात येईल. शिक्षणक्षेत्रामधून बाहेर येणारे स्कॉलर्स आता देश तसेच विदेशांमधील विविध शासकीय यंत्रणांच्या नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतील.

व्यवसाय हा नियोजनाची अंमलबजावणी करीत असल्यामुळे व्यवसायाने नियोजन प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, असेही मत कृपलानी यांनी यावेळी व्यक्त केले. इस्त्राइल आणि अमेरिकेमध्ये नियोजन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने राबविली गेली आहे. व्यावसायिक आणि थिंक टँकच्या समन्वयामुळे हे दोन्ही देश यशस्वी ठरले आहेत. यासारखेच यश मुंबईतील व्यावसायिकांनाही मिळू शकते. सरतेशेवटी हा व्यवसाय असून तो नियोजनाची अंमलबजावणी करतो. त्यामुळे व्यावसायिकांची नियोजनाबाबत मदत घेणे हे सर्वांसाठीच यशदायक आहे, असेही कृपलानी म्हणाल्या.

तंत्रज्ञान, शहरी शिक्षण, पर्यावरण याबाबत इस्त्राईल भारताला खूप काही मदत करू शकतो. एखादी छोटीशी कल्पना तंत्रज्ञानाच्या आधारे यशस्वी करून ती राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर नेण्याची क्षमता भारतामध्ये आहे, असेही कृपलानी म्हणाल्या. आपल्या समारोपपर भाषणामध्ये कृपलानी यांनी मुंबई विद्यापीठ आणि तेल अवीव विद्यापीठाच्या भागीदारीमुळे मुंबई आणि गेट वे हाऊसमध्ये नवीन टॅलेंट निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: The birth of a new think tank due to Indo-Israel Education Partnership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.