जन्मत:च मिळणार हक्काचा ‘आधार’
By admin | Published: February 11, 2016 01:40 AM2016-02-11T01:40:24+5:302016-02-11T01:40:24+5:30
नवजात बालकांची जन्मत:च आधार नोंदणी करण्यात येणार असून, प्रायोगिक तत्वावर ससून रुग्णालयांमध्येमध्ये टॅब च्या माध्यमातून ३० ते ३५ नवजात बालकांना आधार कार्डचे अलिकडेच
पुणे : नवजात बालकांची जन्मत:च आधार नोंदणी करण्यात येणार असून, प्रायोगिक तत्वावर ससून रुग्णालयांमध्येमध्ये टॅब च्या माध्यमातून ३० ते ३५ नवजात बालकांना आधार कार्डचे अलिकडेच वाटप करण्यात आले. सध्या आधार नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या टॅबमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या दुरुस्त झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये आधार नोंदणीची सोय करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिवडणूक निर्णय अधिकारी समीक्षा चंद्राकार यांनी दिली. नव्याने उपलब्ध झालेल्या १०० आधार नोंदणीच्या मशीनपैकी ८९ मशिन जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये मुलांची आधार नोंदणी देण्यात आली आहे. तर ४० मशिन सर्वांधिक कमी नोंदणी झालेल्या मावळ तालुक्यासाठी देण्यात आल्या. हवेली आणि मुळशी तालुक्यात शंभर टक्के लोकांची आधार नोंदणी झाली असून, अन्य तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांच्या पुढे आधार नोंदणी केली आहे.