बिट मार्शलच्या सतर्कतेने टळला प्रसंग

By admin | Published: July 20, 2015 01:47 AM2015-07-20T01:47:19+5:302015-07-20T01:47:19+5:30

चार वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घणसोली येथे घडली. मात्र दक्ष नागरिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे बिट मार्शल

Bit Marshal's alertness escapes | बिट मार्शलच्या सतर्कतेने टळला प्रसंग

बिट मार्शलच्या सतर्कतेने टळला प्रसंग

Next

नवी मुंबई : चार वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घणसोली येथे घडली. मात्र दक्ष नागरिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे बिट मार्शल आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मुलीची सुखरूप सुटका केली. अपहरणकर्त्याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घणसोली येथील पामबीच मार्गावर रात्री ११ वाजता प्रकार घडला. निर्जनस्थळी स्कूटी उभी करून लहान मुलीसह तरुण झाडीमध्ये गेल्याची माहिती एका दक्ष नागरिकाने पोलिसांना दिली. त्यानुसार कोपरखैरणे पोलिसांच्या घणसोली चौकीतील बिट मार्शल बळीराम चव्हाण व दीपक गाडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी पामबीच मार्गावर निर्जनस्थळी उभी केलेली स्कूटी दिसली. मात्र तिथे कोणीच नसल्याने त्यांनी झाडीमध्ये पाहिले असता लहान मुलगी व तरुण आढळला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता झाडीत घुसून राहुल पाटेकर (२०) याला ताब्यात घेतले. तो घणसोली सेक्टर ३ येथील ग्रीन पार्क सोसायटीत राहणारा विद्यार्थी आहे. पोलिसांच्या चौकशीत मुलीसोबत नाते असल्याचे व नैसर्गिक विधीसाठी तिला झाडीत नेल्याचे सांगितले. परंतु मुलीने राहुलला ओळखण्यास नकार दिला. अखेर पोलिसांन चौकशी करत मुलीचे घर गाठले असता तिच्या आई-वडिलांनीही राहुलला ओळखले नाही. घरच्यांनी मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.
घणसोली घरोंदा येथे राहणारी ही चार वर्षांची मुलगी रात्री १०.३०च्या सुमारास नेहमीप्रमाणे इमारतीखाली खेळत होती. या वेळी स्कूटीवरून आलेल्या राहुल पाटेकर (२०) याने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला जवळ बोलवले.
त्यानंतर तिचे तोंड दाबून स्कूटीवरून पामबीच मार्गावर निर्जन स्थळी नेले. तो तिला रस्त्यालगतच्या झाडीमध्ये नेत असताना एका मोटारसायकलस्वाराला त्याच्यावर संशय आल्याने त्याने पोलिसांना कळवले. पोलिसांना काही मिनिटांचा विलंब झाला असता तर ही चिमुरडी राहुलच्या वासनेची बळी ठरली असती. घटनास्थळ रबाळे पोलिसांच्या हद्दीत असल्याने त्याला रबाळे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप जगदाळे यांनी सांगितले.
वैद्यकीय चाचणीत मुलीसोबत गैरकृत्य झालेले नसल्याचे स्पष्ट
झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच नगरसेवक घनश्याम
मढवी, सुरेश सकपाळ, संदीप
गलुगडे, आत्माराम सणस, राजू
गावडे यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

Web Title: Bit Marshal's alertness escapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.