औषध विक्रीलाही कोरोनाचा कडू डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:29 AM2020-06-06T05:29:55+5:302020-06-06T05:30:14+5:30

राज्यातील केमिस्ट आर्थिक अडचणीत : विक्रीत २५ ते ३० टक्के घट, फार्मा कंपन्यांचेही नुकसान

Bitter doses of corona for drug sales | औषध विक्रीलाही कोरोनाचा कडू डोस

औषध विक्रीलाही कोरोनाचा कडू डोस

Next

संदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात केवळ औषध विक्री करणाऱ्या दुकानांचे ‘शटर’ कधीच ‘डाऊन’ झाले नाही. या केमिस्टच्या दुकानांसमोर कायम रांगा दिसायच्या. मात्र, त्यानंतरही गेल्या ७० दिवसांत औषध विक्रीच्या प्रमाणात २५ ते ३० टक्के घट झाली आहे. किरकोळ विक्रेतेच नव्हेतर, मोठ्या फार्मा कंपन्याही तोट्यात गेल्याची माहिती आहे.


देशातील औषध विक्री करणाºया कंपन्यांची वार्षिक उलाढाल सुमारे २ लाख २५ हजार कोटी आहे. त्यापैकी १८ टक्के म्हणजेच ४०,५०० कोटींची औषध विक्री महाराष्ट्रात होते. त्यातही ५५ टक्के (सुमारे २२,३०० कोटी) व्यवसाय मुंबई महागनर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील आहे. उर्वरित महाराष्ट्रातील व्यवसाय त्या तुलनेत कमी (४५ टक्के) आहे. महाराष्ट्रात ७० हजार केमिस्ट कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून ही दुकाने आवश्यक ती खबरदारी घेऊन सुरू ठेवण्यात
आली होती. दुकानांबाहेर औषध खरेदीसाठी कायम गर्दी असायची. मात्र, त्यानंतरही या वर्षीच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांची तुलना एप्रिल आणि मे महिन्यांशी केल्यास औषधांच्या विक्रीत २५ ते ३० टक्के घट झाल्याची माहिती आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टचे (एआयओसीडी) अध्यक्ष आ. जगन्नाथ शिंदे यांनी दिली.


केमिस्टच्या खर्चात वाढ; कर्मचाऱ्यांचा काढला आरोग्य विमा
च्औषध विक्रीत खंड पडू नये यासाठी कर्मचाºयांना दुप्पट वेतन देऊन काम करण्यासाठी प्रवृत्त करावे लागत होते. अनेक मालकांनी कर्मचाºयांचा आरोग्य विमाही काढला. त्याशिवाय कर्मचारी कोरोनाबाधित झाला तर त्याच्यावरील उपचार आणि अन्य कर्मचाºयांसाठी क्वारंटाइनची व्यवस्थाही अनेक विक्रेत्यांनी केली.


च्सामाजिक कर्तव्य म्हणून अनेकांनी सॅनिटायझर्स, मास्क विनामूल्य वाटले. त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ झाली. भायखळा येथील एका ज्येष्ठ औषध विक्रेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर, जवळपास १०० कर्मचारी आणि मालकांना कोरोनाची लागण झाली. मात्र, ते ज्या परिस्थितीत काम करीत आहेत त्या तुलनेत सुदैवाने ही संख्या कमी असल्याचे सांगत शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.

दवाखाने बंदचा परिणाम
लॉकडाऊनमुळे केमिस्ट कार्यरत असले तरी सरकारने वारंवार इशारा देऊनही बहुसंख्य जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली होती. याशिवाय अनेक शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यात अनेक रुग्णांचे हालही झाले. यासारख्या अनेक कारणांमुळे औषधांच्या विक्रीतही घट झाली आहे.
- जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष, एआयओसीडी

फार्मा कंपन्यांचे
१२ टक्के नुकसान

गेल्या आर्थिक वर्षातील सरासरी उलाढालीची तुलना एप्रिल महिन्यातील लॉकडाऊनच्या काळाशी केल्यास १२ टक्के घट झाली आहे. २०१७ साली जीएसटी लागू झाल्यानंतरची ही सर्वांत मोठी घट आहे.

Web Title: Bitter doses of corona for drug sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.