नाशिकजवळ विचित्र अपघात, 3 ठार 9 गंभीर जखमी

By Admin | Published: June 4, 2017 12:09 PM2017-06-04T12:09:56+5:302017-06-04T12:09:56+5:30

येवला-कोपरगाव रस्त्यावर झालेल्या विचित्र अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. येथील अंचलगाव फाट्याजवळ रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास कंटेनरने एका वळणावर टेम्पो

Bizarre accidents near Nashik, 3 killed, 9 seriously injured | नाशिकजवळ विचित्र अपघात, 3 ठार 9 गंभीर जखमी

नाशिकजवळ विचित्र अपघात, 3 ठार 9 गंभीर जखमी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

येवला (नाशिक), दि. 4 - येवला-कोपरगाव रस्त्यावर झालेल्या विचित्र अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. येथील अंचलगाव फाट्याजवळ रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास  कंटेनरने एका वळणावर टेम्पो, व्हॅन,आणि मॅजिक गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात 3 ठार तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत.

कंटेनर शिर्डीवरून येवल्याकडे येत असताना चालकाचा ताबा सुटला आणि येवल्याकडून शिर्डीच्या दिशेने जाणा-या एक टेम्पो,व व्हॅनला जोरदार धडक देऊन त्या दोन्ही गाड्या पलटी झाल्या.अजिंठा एक्सप्रेसने नगरसुल रेल्वे स्टेशनवर उतरलेले हैद्राबाद येथील 12 साईभक्त प्रवाशी वाहतूक गाडी टाटा मॅजिकने(MH15 E 4803) शिर्डीला चालले होते. दरम्यान येवला शिर्डी रस्त्यावर पिंपळगाव टोलनाक्यानजीक अंचलगांव फाटा वळणावर कंटेनरची या गाडीलाही जोरदार धडक बसली. या धडकेत,टाटा मॅजिक गाडीच्या चालकासह 3 जण ठार झाले तर 9 जखमी झाले आहेत.

मृत्यूमुखी पडलेले झालेले चालक शिवाजी लक्ष्मण मांजरे(वय 35),व अन्य 2 दोन जण हैदराबाद येथील आहे. त्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

Web Title: Bizarre accidents near Nashik, 3 killed, 9 seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.