भाजपात ४५ इन,२७ आऊट !

By admin | Published: October 22, 2014 06:33 AM2014-10-22T06:33:14+5:302014-10-22T06:33:14+5:30

ऐनवेळी भाजपात इनकमिंग केलेल्या उमेदवारांना मतदारांनी चांगलाच धडा शिकवला. भाजपाने आयात केलेल्या ४५ उमेदवारांपैकी केवळ १७ जागेवर 'आया'रामांना विजय मिळवता आला.

BJP 45 in, 27 out! | भाजपात ४५ इन,२७ आऊट !

भाजपात ४५ इन,२७ आऊट !

Next
बबन लिहिणार
मुंबई, दि. २२ - ऐनवेळी भाजपात इनकमिंग केलेल्या उमेदवारांना मतदारांनी चांगलाच धडा शिकवला. भाजपाने आयात केलेल्या ४५ उमेदवारांपैकी केवळ १७ जागेवर 'आया'रामांना विजय मिळवता आला. ११ उमेदवारांना मतदारांनी पराभवाची धूळ चारली तर १६ जणांना तिस-या व चौथ्या जागांवर समाधान मानावे लागले. ४५ आयात उमेदवारांपैकी तब्बल २७ उमेदवारांना मतदारांनी सपशेल नाकारले आहे. 
शिवसेना-भाजपा युती व काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी तुटल्याने राज्यात पंचरंगी लढत पाहायला मिळाली. मित्रपक्षांना सोबत घेवून २८८ जागा लढणा-या भाजपाने तब्बल ४५ उमेदवार अन्य पक्षातून आयात करीत त्यांना निवडणूक मैदानात उतरवले. मोदी लाटेत या जागा सहज भाजपाला जिंकता येतील असा राज्यातील भाजपा नेत्यांचा अंदाज होता. परंतू मतदार राजांनी पक्ष बदलणा-या २७ जणांचा दणदणीत पराभव केला. यामध्ये विद्यमान आमदार आणि काही माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. भाजपाच्या तिकिटावर पहिल्यांदाच निवडणूक लढविणा-या काही उमेदवार (आयाराम )वर गुन्हेगारी व भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. निवडणुकीत पराभव पत्कारावा लागल्याने आता हे नेते विरोधकांच्या हिटलिस्टवर येण्याची शक्यता आहे. भाजपाने जिंकलेल्या १७ जागेवर राष्ट्रवादीच्या ९ उमेदवारांचा, शिवसेनेच्या ४ आणि काँग्रेस ३ व शेकापच्या एका उमेदवाराचा पराभव केला. तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपाच्या आयात केलेल्या १२ उमेदवारांचा, काँग्रेसने ६, राष्ट्रवादीने ८ आणि मनसेने एका उमेदवाराचा पराभव केला. 
 
विजयी उमेदवार
नंदुरबार - विजयकुमार गावित यांनी काँग्रेसच्या कुणाल वासवे यांचा ३६ हजार ११८ मतांनी पराभव केला. 
धुळे - अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीच्या राजवर्धन कदमबांडे यांचा १२ हजार ९२८ मतांनी पराभव केला. 
भुसावळ - संजय सावकारे यांनी राष्ट्रवादीच्या राजेश झळते यांचा ३४ हजार ६९७ मतांनी पराभव केला. 
अमरावती - सुनील देशमुख यांनी काँग्रेसच्या रावसाहेब शेखावत  यांचा ३५ हजार ७२ मतांनी पराभव केला. 
हिंगणा - समीर मेघे  यांनी राष्ट्रवादीच्या रमेशचंद्र बंग यांचा २३ हजार १५८ मतांनी पराभव केला. 
गंगापूर - प्रशांत बंब यांनी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचा १७ हजार २७८ मतांनी पराभव केला. 
आष्टी - भीमराव धोंडे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा ५ हजार ९८२ मतांनी पराभव केला. 
शेवगाव - मोनिका रजाळे यांनी राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर घुले यांचा ५३ हजार १८५ मतांनी पराभव केला. 
मुरबाड - किसनराव कथोरे यांनी राष्ट्रवादीच्या गोटीराम पवार यांचा २६ हजार २३० मतांनी पराभव केला. 
बेलापूर - मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा १ हजार ४९१ मतांनी पराभव केला. 
घाटकोपर प. - राम कदम यांनी शिवसेनेच्या सुधीर मोरे यांचा ४१ हजार ९१६ मतांनी पराभव केला. 
पनवेल - प्रशांत ठाकूर यांनी शेकापच्या बलराम पाटील यांचा  १३ हजार २१५ मतांनी पराभव केला. 
चिंचवड - लक्ष्मण जगताप यांनी शिवसेनेच्या राहुल कलाटे यांचा ६० हजार ३०५ मतांनी पराभव केला. 
कोपरगाव - स्नेहलता कोल्हे यांनी शिवसेनेच्या आशुतोष काळे यांचा २९ हजार ७२७ मतांनी पराभव केला. 
नेवासा - बाळासाहेब मुरकुटे यांनी राष्ट्रवादीच्या शंकरराव गडाख यांचा ४ हजार ६५९ मतांनी पराभव केला. 
शिराळा - शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या मानसिंग नाईक यांचा ३ हजार ९४१ मतांनी पराभव केला. 
कोल्हापूर द.-  अमोल महाडीक यांनी काँग्रेसच्या सतेज पाटील यांचा ८ हजार ५२८ मतांनी पराभव केला. 
 
पराभूत उमेदवार
सिन्नर - माणिकराव कोकाटे शिवसेनेच्या  राजाभाऊ वझे यांच्याकडून २० हजार ५५४ मताने पराभूत
धुळे ग्रामिण - मनोहर भदाणे काँग्रेसच्या  कुणाल पाटील यांच्याकडून ५३ हजार ९१८ मताने पराभूत 
भोकर - माधवराव किन्हाळकर काँग्रेसच्या अमिता चव्हाण यांच्याकडून  ४७ हजार ५५७ मताने पराभूत 
नांदेड दक्षिण - दिलीप कंदकुर्ते शिवसेनेच्या  हेमंत पाटील यांच्याकडून ३ हजार २०७ मताने पराभूत
लातूर - शैलेश लाहोटी काँग्रेसच्या  अमीत देशमुख यांच्याकडून  ४९ हजार ४६५ मताने पराभूत 
बीड - विनायक मेटे राष्ट्रवादीच्या जयदत क्षीरसागर यांच्याकडून ६ हजार १३२ मताने पराभूत
घनसावंगी - विलास खरात राष्ट्रवादीच्या  राजेश टोपे यांच्याकडून ४३ हजार ४७६ मताने पराभूत 
सावंतवाडी - राजन तेली शिवसेनेच्या  दीपक केसरकर यांच्याकडून ४१ हजार ११२ मताने पराभूत 
श्रीगोंदा - बबनराव पाचपुते राष्ट्रवादीच्या राहुल जगताप यांच्याकडून १३ हजार ६३७ मताने पराभूत
श्रीरामपूर - भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसच्या  भाऊसाहेब कांबळे यांच्याकडून ११ हजार ४८४ मताने पराभूत 
तासगाव - अजित घोरपडे राष्ट्रवादीच्या  आर.आर.पाटील यांच्याकडून  २२ हजार ४१० मताने पराभूत
 
तिस-या स्थानी घसरलेले उमेदवार 
चोपडा - जगदीश वळवी - २३ हजार ६१७ मतांनी तिस-या स्थानावर.  शिवसेनेचे चंद्रकांत सोनावणे विजयी.
नांदगाव - अद्वय हिरे -  १८ हजार ९१२ मतांनी तिस-या स्थानावर. राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ विजयी.
निफाड - वैकुंठ पाटील - ६० हजार १५५ मतांनी तिस-या स्थानावर. शिवसेनेचे अनिल कदम विजयी. 
बुलडाणा - योगेंद्र गोळे - १३ हजार ७४८ मतांनी तिस-या स्थानावर. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ विजयी. 
परभणी - आनंद भरोसे - २९ हजार ५३३ मतांनी तिस-या स्थानावर. शिवसेनेचे  डॉ. राहुल पाटील विजयी. 
उस्मानाबाद - संजय दुधगावकर ६२ हजार ३८८ मतांनी तिस-या स्थानावर. राष्ट्रवादीचे  जगजीतसिंह राणा-पाटील विजयी. 
कन्नड - डॉ. संजय गव्हाणे - ३४५०५ मतांनी तिस-या स्थानावर. शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव विजयी. 
जालना - अरविंद चव्हाण - ७ हजार ४८७ मतांनी तिस-या स्थानावर. शिवसेनेचे अर्जून खोतकर विजयी. 
पैठण - विनायक हिवाळे - १७ हजार ६० मतांनी तिस-या स्थानावर. शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी. 
जुन्नर - नेताजी दादा डोके - ३७ हजार ८५० मतांनी तिस-या स्थानावर. मनसेचे शरद सोनावणे विजयी. 
खेड-आळंदी - शरद बुट्टे पाटील - ८६ हजार ६५३ मतांनी तिस-या स्थानावर. शिवसेनेचे  सुरेश गोरे विजयी. 
आंबेगाव - जयसिंग एरंडे - १ लाख १५ हजार ६२० मतांनी तिस-या स्थानावर. राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील विजयी. 
पारनेर - बाबासाहेब तांबे - ४९ हजार २१३ मतांनी तिस-या स्थानावर. शिवसेनेचे विजय औटी विजयी. 
अहमदनगर - अभय आगरकर - ४६ हजार ६१ मतांनी तिस-या स्थानावर. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विजयी.  
भोर - शरद ढमाले - ५४ हजार १६२ मतांनी तिस-या स्थानावर. काँग्रेसचे  संग्राम थोपटे विजयी. 
पुरंदर - संगिता राजे निंबाळकर - ६३ हजार ४२१ मतांनी तिस-या स्थानावर. शिवसेनेचे विजय शिवतारे विजयी. 

 

Web Title: BJP 45 in, 27 out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.