भाजपाने जनतेचा कौल स्विकारला, पराभवाची कारणे शोधु - आ.चिखलीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 05:00 PM2017-10-13T17:00:28+5:302017-10-13T17:01:57+5:30

नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला अपयश आले. हा पराभव स्विकारतानाच त्या मागील कारणेही  शोधु असे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

BJP accepts people's welfare, find out the reasons for defeat - mla Chikhalikar |  भाजपाने जनतेचा कौल स्विकारला, पराभवाची कारणे शोधु - आ.चिखलीकर

 भाजपाने जनतेचा कौल स्विकारला, पराभवाची कारणे शोधु - आ.चिखलीकर

googlenewsNext
ठळक मुद्देहा पराभव स्विकारतानाच त्या मागील कारणेही  शोधु भाजपाला यंदा २४ % मतांची वाढ मिळाली आहे. काँग्रेसने शहर विकासासाठी पुढाकार घ्यावा.

नांदेड, दि. १३ : नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला अपयश आले. हा पराभव स्विकारतानाच त्या मागील कारणेही  शोधु असे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपयश आल्या नंतर भाजपाच्या वतीने आज शहरातील ओम गार्डन येथे पत्रकार परिषदेत आ. चिखलीकर बोलत होते. यावेळी बहुजन विकास आघाडीचे सुरेश गायकवाड, भाजपा महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, पक्ष प्रवक्ते सुनील नेरलकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी महानगराध्यक्ष हंबर्डे म्हणाले की, आम्ही अपयशी झालो तरी विरोधकांना आम्ही सहज जिंकू दिले नाही. गेल्या मनपा निवड़णूकीपेक्षा भाजपाला यंदा २४ % मतांची वाढ मिळाली आहे. यावेळी बहुजन विकास अघाडीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गायकवाड म्हणाले की, निवडणूक भाजपाने ताकदीने लढली मात्र यश मिळाले नाही.  जनतेचा कौल खुल्या अंतकरणांने स्वीकारत असून भविष्यात काँग्रेसवर बाहेरून नजर ठेवून विकासकामांसाठी पाठपुरावा करू.  यापुढे भाजपा सोबतच राहू असा शब्दही गायकवाड यांनी दिला.

पराभवाचे कारण शोधू 
यानंतर आ.चिखलीकर म्हणाले की, मागील  १९ वर्षात शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही. त्यानंतरही  जनतेने सत्ता दिली. त्यामुळे आता तरी काँग्रेसने शहर विकासासाठी पुढाकार घ्यावा. पराभवाची कारणे शोधून काढु, आमचे अपयश म्हणजे जनतेने आमचा जाहिरनामा नामुंजर  केल्याची कबुलीही चिखलीकरांनी दिली. केंद्र तथा राज्याकडुन भेटणाऱ्या निधीत शहराचा विकास असतो त्यात मी आडकाठी घालणार नसल्याचे ते म्हणाले. लातूर नांदेड आणि जुने नवे हा वाद नव्हता तर तो जाणिवपूर्वक तयार करण्यात आला होता असेही त्यांनी यावेळी सांगितले

Web Title: BJP accepts people's welfare, find out the reasons for defeat - mla Chikhalikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा