ओबीसी आरक्षण: भाजपचे उल्हासनगर येथे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:50 PM2021-06-26T16:50:05+5:302021-06-26T16:51:09+5:30
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपने न्युईरा शाळा परिसरात रास्ता रोको आंदोलन केले.
सदानंद नाईक
उल्हासनगर: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपने न्युईरा शाळा परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. ओबीसींचे रद्द केलेले आरक्षण पुन्हा मिळावे. याकरिता भाजपच्या वतीने शनिवारी राज्यभर रास्ता रोखो आंदोलन करण्यात येत आहे.
शहर भाजपच्या वतीने कॅम्प नं-३ येथील न्यूईरा हायस्कूल चौक, कॅम्प नं-३ येथे आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनादास पुरस्वनी, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुभाष तानवडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोखो आंदोलनाचे आयोजित करण्यांत आले. यावेळी नगरसेवक महेश सुखरामनी, राजेश वधारीया, राजू जाग्याशी, ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य लता पगारे, जिल्हा महासचिव मंगला चांडा, ओबीसी महिला अध्यक्ष स्नेहलता कालशेट्टी, उमेश सोनार, होमनारायन वर्मा, ओबीसी महासचिव उमेश पंडित, रघुनाथ ओवेलकर राजेश यादव,मंगेश केने, नीलेश बोबडे ,संतोष सानप, भावना पेडणेकर अपर्णा खर्चे, अनिल कट्यारे , आदी भाजप ओबीसी मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते