OBC Reservation: उल्हासनगरात भाजपचं आक्रोश आंदोलन, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 18:25 IST2021-06-03T18:24:21+5:302021-06-03T18:25:38+5:30
OBC Reservation: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपने तहसील कार्यालयावर आक्रोश आंदोलन करून निवेदन दिले.

OBC Reservation: उल्हासनगरात भाजपचं आक्रोश आंदोलन, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा निषेध
सदानंद नाईक
उल्हासनगर : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपने तहसील कार्यालयावर आक्रोश आंदोलन करून निवेदन दिले. आंदोलनात आमदार कुमार आयलानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आल्याचा आरोप भाजपने केला. राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोधात करण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने गुरवारी दुपारी तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार कुमार आयलानी ,भाजपचे शहराध्यक्ष जमनदास पुरस्वनी, ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुभाष तानवडे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, नगरसेवक राजू जग्याशी, महेश सुखरामनी, मनोहर खेमचंदनी, अमर लुंड, कुमार भटीजा, मंगला चांडा, ओबीसी महिला अध्यक्ष स्नेहलता कलशेट्टी, अजित सिंग लबाणा, आदि भाजप ओबीसी पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.