भाजप प्रदेशाध्यक्ष आघाडीवर , कॉंग्रेसचे पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 09:19 AM2019-05-23T09:19:46+5:302019-05-23T09:20:37+5:30
भाजप आणि कॉंग्रेससाठी हे दोन्ही मतदारसंघ प्रतिष्ठेचे आहे. त्यामुळे या ठिकाणी काय निकाल लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे निकाल येणे सुरु झाले आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत देशात भाजप २३६, कॉंग्रेस ११२ वर आघाडीवर असल्याचे आकडे समोर येत आहे.महाराष्ट्रात भाजप १२, शिवसेना११, कॉंग्रेस ५ , राष्ट्रवादी ९ जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष आघाडीवर आहेत.
सगळ्यांचे लक्ष लागलेल्या जालना लोकसभा मतदार संघातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे २४ हजार मतांनी आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. तर, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पिछाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे.
भाजप आणि कॉंग्रेससाठी हे दोन्ही मतदारसंघ प्रतिष्ठेचे आहे. त्यामुळे या ठिकाणी काय निकाल लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.