जेलमधून आल्यापासून संजय राऊत बिघडलेत; फडणवीसांच्या टीकेवर भाजपाचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 02:38 PM2022-12-18T14:38:28+5:302022-12-18T14:39:32+5:30
महाविकास आघाडीचा मुंबईतील निघालेल्या महामोर्चा हे लग्नाचं वराड होतं अशी टीका बावनकुळेंनी केली आहे.
मुंबई - ठाकरे गटांचे खासदार संजय राऊत हे जेव्हापासून जेलमधून आले आहे तेव्हा पासून ते बिघडले आहे. त्यांना हे माहिती नाही की सीमावाद हे ७० वर्ष जुना वाद आहे अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाविकास आघाडीचा मुंबईतील निघालेल्या महामोर्चा हे लग्नाचं वराड होतं अशा शब्दात बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चावरही टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊतांनी केली होती टीका
देवेंद्र फडणवीस यांची बुद्धी नॅनो असून महाविकास आघाडीचा विराट मोर्चा त्यांना नॅनो दिसत असेल तर त्यांना दिल्लीला गेल्यावर गुंगीचे इंजेक्शन दिलं असेल आणि त्याची गुंगी अजून उतरली नसल्याची खोचक टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. साताऱ्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, शनिवारचा मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या शक्ती विरोधात होता आणि या मोर्चाला देवेंद्र फडणवीस यांनी सामोर जायला पाहिजे होतं. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची अवहेलना फार करून घेऊ नये आपलं राजकीय भविष्य मोठं होणार आहे. होऊ शकतं त्यांच्याकडे ती क्षमता असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
राऊतांची बुद्धी नॅनो झाली म्हणून...
फडणवीसांच्या टीकेवर शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं की, आमची बुद्धी नॅनो नाही तर प्रगल्भ आहे. बुद्धी त्यांची नॅनो झाली जे बाळासाहेबांची विचार सोडून अभद्र युतीच्या मार्गाने गेले. कालचा मोर्चा अभद्र युतीचा होता आणि मोर्चात सहभागी तीन लाखांची घोषणा केली प्रत्यक्षात तीस हजार लोक जमा करता आले नाही हे त्यांचं अपयश आहे. संजय राऊतांना दिवसा स्वप्न पडतात. कारखाना बंद पडणार प्रॉडक्शन बंद होणार ही गोष्ट वेगळी आहे. आमच सरकार कार्यकाळ तर पूर्ण करणारच आणि आणखी यांना १५ वर्षे येऊ देणार नाही आणि १५ वर्षे हे सरकार पुन्हा येईल अशा प्रकारचे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे चालू आहे असं प्रत्युत्तर आमदार संजय गायकवाड यांनी खासदार संजय राऊत यांना दिले आहे.