पाणी प्रश्नावर वाद पेटला; शिवसेना खासदाराविरोधात भाजपची पोलिस उपायुक्तांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 08:34 PM2021-05-29T20:34:49+5:302021-05-29T20:35:52+5:30

पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलिस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे.

bjp and shiv sena dispute over water issue in kalyan dombivali municipal corporation | पाणी प्रश्नावर वाद पेटला; शिवसेना खासदाराविरोधात भाजपची पोलिस उपायुक्तांकडे तक्रार

पाणी प्रश्नावर वाद पेटला; शिवसेना खासदाराविरोधात भाजपची पोलिस उपायुक्तांकडे तक्रार

Next

कल्याण: घनकचरा व्यवस्थापन करावर शिवसेना भाजपमध्ये वाद पेटला असताना आत्ता पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलिस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे. पाणी प्रश्नावर डोंबिवलीच्या भोपर गावात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी खासदार शिंदे जबाबदार राहतील. त्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे. आत्ता शिवसेना भाजपमधील वाद पोलिस ठाण्यात पोहचल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

कल्याण डोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कर लागू केल्यावर त्याला भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी तीव्र विरोध केला. या प्रकरणी आमदार चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करुन आयुक्तांच्या विरोधातही टिकेची झोड उठविली. तसेच शहरात बॅनर लावून शिवसेनेचा थुकरटपणा असे त्यावर लिहीले होते. चव्हाण यांच्या टिकेला उत्तर देण्यासाठी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे पुढे आले. त्यांनी भाजपवर टिका केली होती. हे प्रकरण ताजे असताना आमदार चव्हाण यांनी आज पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेतली. या दरम्यान भाजप नगरसेविका रविना माळी या देखील होती. रविना माळी यांच्या लेटरहेटवर त्यांनी निवेदन दिले आहे. २७ गावात अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा मंजूर करण्यात आली आहे. ही योजना भाजप सरकारने मंजूर केली आहे. या योजनेच्या कामात खासदार शिंदे यांचा हस्तक्षेप असतो. तसेच भाजप कार्यकत्र्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. या सगळ्य़ाला खासदार शिंदे जबाबदार आहे. आमच्या पक्षाच्या कार्यकत्र्यावर गुन्हे दाखल झाले तर शिवसैनिकांसह खासदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे. यापुढे भोपर गावात पाण्याच्या मुद्यावर काही वाद झाल्यास त्याला खासदार जबाबदार असतील असे म्हटले आहे. त्यांच्या विरोधातही कारवाई केली जावी.

दरम्यान शिवसेनेचे विधानसभा संघटक एकनाथ पाटील यांनी सांगितले की, पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा कार्यादेश मिळालेला नसताना भाजपने भूमीपूजन कसे काय केले. आमच्या लोकप्रतिनिधींनी ही योजना मंजूर करुन आणली आहे. त्यामुळे भूमीपूजन करणो हा आमचा हक्कच आहे. रविना माळी यांचा नगरसेविका पदाचा कार्यकाळ संपला आहे. तरी देखील त्यांचे लेटर हेट वापरून त्याच गैरवापर करीत आमच्याखासदारांना नाहक बदनाम केल्या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.

Web Title: bjp and shiv sena dispute over water issue in kalyan dombivali municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.