“शरद पवार खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं झालं”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 04:53 PM2021-11-18T16:53:54+5:302021-11-18T16:54:50+5:30

भाजप नेते अनिल बोंडे यांनी संजय राऊत, नवाब मलिक आणि शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे. 

bjp anil bonde replied and criticizes sharad pawar sanjay raut and nawab malik over allegations | “शरद पवार खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं झालं”

“शरद पवार खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं झालं”

googlenewsNext

अमरावती: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटरवर अनिल बोंडे यांच्या आवाजातील कथित ऑडिओक्लिप टाकली असून, दंगली भडकावण्याचे काम भाजप नव्हे तर सेक्युलर पक्ष करतात, असे वक्तव्य अनिल बोंडे यांनी केल्याचे दिसत आहे. अनिल बोंडे (Anil Bonde) खोटे बोलतायत, हे दाखवणारीही ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी शेअर केली आहे. यावरून आता भाजप नेते अनिल बोंडे यांनी संजय राऊत (Sanjay Raut), नवाब मलिक आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पलटवार केला आहे. 

ट्विटरवरील वक्तव्यावर ठाम आहे. कधीही हर्बल तंबाखू किंवा दाऊ पिऊन बोलत नाही. नवाब मलिकसारखे बेहिशेबी बोलण्याची माझी सवय नाही, अशी टीका करत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे हात-पाय बांधलेले गृहमंत्री आहेत. त्यांना प्रत्येक गोष्ट विचारून करावी लागते. त्यामुळे त्यांचं गृह विभागावर नियंत्रण नाही, या शब्दांत अनिल बोंडे यांनी हल्लाबोल केला आहे. 

ज्या राज्यात भाजप सरकार नाही तिथेच दंगली होतात

शरद पवार कधीच खोटे बोलत नाहीत असे संजय राऊत यांचे म्हणणे म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असे म्हणण्यासारखे झाले. ज्या राज्यात भाजप सरकार नाही तिथेच दंगली होतात, कारण भाजप सरकार दंगलखोरांवर तातडीने कारवाई करते, असे अनिल बोंडे यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौरा करत आहेत, ते माहिती नाही. त्यांना संतप्त शेतकरी आणि नागरिक जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीकाही बोंडे यांनी केली आहे. 

दरम्यान, अनिल बोंडे यांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विदर्भ काय तुमच्या बापाचा आहे का? शरद पवार महाराष्ट्रात कुठेही फिरू शकतात. भाजपला राज्यातील वातावरण बिघडवायचे आहे. एका माजी मंत्र्याला असे वक्तव्य शोभा देत नाही, असा पलटवार काकडे यांनी केला आहे.
 

Web Title: bjp anil bonde replied and criticizes sharad pawar sanjay raut and nawab malik over allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.