उदयनराजें विरोधात भाजपाकडून उमेदवार ठरला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 12:38 PM2019-02-21T12:38:25+5:302019-02-21T12:40:46+5:30

साताऱ्यामध्ये माथाडी कामगारांची संख्या जास्त आहे. यामुळे पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्याचा इतर मतदारसंघांमध्येही फायदा होऊ शकतो.

BJP announces candidates Against Udayan raje | उदयनराजें विरोधात भाजपाकडून उमेदवार ठरला?

उदयनराजें विरोधात भाजपाकडून उमेदवार ठरला?

Next

सातारा : साताऱ्यात गेल्या काही निवडणुकांत उदयनराजे एकहाती निवडऊन येत आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचे नाव भाजपकडून पुढे करण्यात आले आहे. 


साताऱ्यामध्ये माथाडी कामगारांची संख्या जास्त आहे. यामुळे पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्याचा इतर मतदारसंघांमध्येही फायदा होऊ शकतो. याचा विचार करून खासदार उदयन राजे यांच्याविरोधात पाटील यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजपामध्ये सुरु आहे. 
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नावाची भाजपकडून चाचपणी सुरु आहे. उदयन राजे राष्ट्रवादीचे खासदार असले तरीही शरद पवार वगळता एकाही नेत्याशी त्यांचे जुळत नाही. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते नाराज होते. यामुळे भाजपाने त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्नही केला होता. उदयनराजेंनी उघडपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही स्तुती केली होती. तसेच मुंबईमध्ये भेटही घेतली होती. या पाश्वभुमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची वेळोवेळी भेट घेत मनधरणीही केली होती. 


अखेर गेल्या काही दिवसांपूर्वीच उदयनराजेंची साताऱ्यात शरद पवार यांनी भेट घेत खासदारकीची जागा पक्की केली होती. यानंतर उदयन राजेंनी पक्षाच्या प्रचारासाठी अन्य मतदासंघांमध्येही यावे अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली होती. साताऱ्यातून उदयनराजेंना विरोध असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार का नाही, याबाबत चर्चा होती. मात्र, पवार-भोसले भेटीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

आता लग्नात अक्षता टाकाच्या वक्तव्याने कल्ला...
उदयनराजे भोसले यांनी महिन्याभरापूर्वी साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं भरभरून कौतुक करतानाच, अप्रत्यक्षपणे त्यांना मतं देण्याचं आवाहन केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 'तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे निर्णय घेतले, ते यापूर्वी कुणीही घेतले नव्हते. घोषणा भरपूर झाल्या, पण अंमलबजावणी झाली नव्हती', असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र सरकारची पाठ थोपटली. साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसही स्टेजवर होते. 


एका महिन्याभरात माझं लग्न आहे आणि तीन-चार महिन्यांनंतर या सगळ्यांचं लग्न आहे. अक्षता टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला. इतक्यात टाकू नका. नाहीतर त्यावेळी म्हणाल, तुम्ही सांगितल्या म्हणून अक्षता टाकल्या आता शिल्लकच राहिल्या नाहीत, असं मजेशीर; पण तितकंच सूचक वक्तव्य उदयनराजे यांनी केलं.

Web Title: BJP announces candidates Against Udayan raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.