भाजपाकडून मुख्य प्रतोदांच्या नावाची घोषणा, या आमदाराला दिली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 21:36 IST2024-12-18T21:35:49+5:302024-12-18T21:36:00+5:30

Randhir Savarkar News: भाजपाने विधानसभेमधील आपल्या मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाने आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे.

BJP announces name of main candidate, gives opportunity to MLA Randhir Savarkar | भाजपाकडून मुख्य प्रतोदांच्या नावाची घोषणा, या आमदाराला दिली संधी

भाजपाकडून मुख्य प्रतोदांच्या नावाची घोषणा, या आमदाराला दिली संधी

भाजपाने विधानसभेमधील आपल्या मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाने आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. याआधी आमदार आशिष शेलार यांनी भाजपाच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. आशिष शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आता त्यांच्या जागी ही जबाबदारी रणधीर सावरकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

रणधीर सावरकर हे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना शिवसेना ठाकरे गटाच्या गोपाल दाटकर यांचा ५० हजार ६१३ मतांनी पराभव केला होता.  

Web Title: BJP announces name of main candidate, gives opportunity to MLA Randhir Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.