Sanjay Raut vs Ashish Shelar: "काही लोक संपादक आहेत की केवळ ...'? त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे वायुप्रदूषणाचा कार्यक्रम"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:00 PM2022-12-08T15:00:16+5:302022-12-08T15:02:12+5:30

आशिष शेलारांनी संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला

BJP Ashish Shelar sarcastic trolled Sanjay Raut over Gujarat Election Result 2022 Live updates | Sanjay Raut vs Ashish Shelar: "काही लोक संपादक आहेत की केवळ ...'? त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे वायुप्रदूषणाचा कार्यक्रम"

Sanjay Raut vs Ashish Shelar: "काही लोक संपादक आहेत की केवळ ...'? त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे वायुप्रदूषणाचा कार्यक्रम"

googlenewsNext

Sanjay Raut vs Ashish Shelar, Gujarat Election Result 2022 Live: नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने दमदार विजय नोंदवला. भाजपाला पराभवाचा धक्का देणारा असा हा निकाल ठरला. पण आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजपाने एकहाती सत्ता राखली. भाजपाने केवळ सत्ता कायमच ठेवली नाही, तर विक्रमी कामगिरीही केली. असे असले तरी खासदार संजय राऊत यांनी मात्र भाजपावर घणाघाती आरोप केला. आप आणि भाजपा यांच्यात साटं-लोटं आहे. त्यामुळे दिल्लीत आप जिंकला आणि गुजरातमध्ये भाजपा जिंकला. तशी डील दोन्ही पक्षात झाली असल्याच्या चर्चा आहेत, असे ते म्हणाले. यावर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी त्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले.

"काही लोकं हे संपादक आहेत की केवळ पादक आहेत हे आता पाहावं लागेल. कारण सार्वजनिक ठिकाणी वायु प्रदुषणाचा कार्यक्रम म्हणजे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद," असा शब्दांत शेलारांनी राऊतांचा खरपूस समाचार घेतला. "मुंबईच्या महापालिकेत निवडणूक नक्कीच अटीतटीची होऊ शकेल. पण ज्या प्रकारे दिल्ली किंवा गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने मुसंडी मारत यश संपादन केले आहे, त्यावरून एक गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीत आता भाजपाचा प्रमुख विरोधक आम आदमी पार्टीच असेल, कारण इतर पक्ष आता खिजगणतीतही नाही असंच चित्र दिसतंय," असा टोलाही त्यांनी लगावला.

"ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींच्या सभांना प्रतिसाद मिळाला, अमित शाह यांनी रणनिती आखली आणि जेपी नड्डा यांनी संघटन कौशल्य दाखवले, त्याचाच हा विजय आहे. स्थानिक भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना घेऊन जे मोर्चेबांधणी करण्यात आली त्याच वेळी, समोर कोणाचंही आव्हान नाही असं जनता म्हणत होती. तेच मतपेटीतून दिसून आले. हिमाचलमध्ये पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणे योग्य नाही," अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी निवडणुकींच्या निकालाबद्दल दिली.

संजय राऊत नक्की काय म्हणाले होते?

"गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने इतर पक्षांसोबत चर्चा करून सामंजस्याने निवडणूक लढवायला हवी होती. पण बहुतेक दिल्ली तुम्ही घ्या आणि भाजपा आम्हाला द्या अशा पद्धतीचे 'डील' झाले असावे अशी लोकांना शंका असल्याचा घणाघाती आरोप संजय राऊतांनी केला. "तीन प्रमुख निवडणुकांमध्ये दिल्ली भाजपाच्या हातून गेलं, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने टक्कर दिल्याने भाजपाला संघर्ष करावा लागतोय तर गुजरात मध्ये बाजी त्यांची आहे. आम्ही तिनही पक्षांचे अभिनंदन करतो. पण ज्याप्रकारचे निकाल आले आहेत, त्यात दोन पक्षांमध्ये 'डील' झाली होती की काय, असा संशय लोकांना येऊ लागलाय," असं मत राऊतांनी मांडले.

Web Title: BJP Ashish Shelar sarcastic trolled Sanjay Raut over Gujarat Election Result 2022 Live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.