Ashish Shelar :"वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन, पार्टीशिवाय काहीच दिसत नाही", आशिष शेलारांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 01:32 PM2022-10-20T13:32:36+5:302022-10-20T13:43:18+5:30
BJP Ashish Shelar Slams Aaditya Thackeray : आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. "वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन आणि पार्टी याशिवाय काहीच दिसत नाही" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. "जे घरात झोपून राहतात, घरकोंबडे आहेत, ते जनतेत राहतील कसे?" असा सवाल करत बोचरी टीका केली आहे. यासोबतच "वरळीत आदित्य ठाकरे आता आले आहेत. त्यांचा अभ्यास कच्चा आहे" असंही म्हटलं आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "वरळीतील जांबोरी मैदानात भाजपाचे कार्यक्रम होत आहेत, कारण मुंबईकरांशी आमची नाळ जोडलेली आहे. मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे आम्हाला कळतं. जे टीका करत आहेत त्यांना मुंबईकारांशी काही घेणे देणे नाही. विशेषतः वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन आणि पार्टी याशिवाय काहीच दिसत नाही" असं शेलार यांनी म्हटलं आहे.
वरळीतील जांबोरी मैदानात भाजपाचे कार्यक्रम होत आहेत, कारण मुंबईकरांशी आमची नाळ जोडलेली आहे. मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे आम्हाला कळतं. जे टीका करत आहेत त्यांना मुंबईकारांशी काही घेणे देणे नाही. विशेषतः वरळीच्या आमदारांना पेग, पेग्विन आणि पार्टी याशिवाय काहीच दिसत नाही. pic.twitter.com/lWnwhGXKY2
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 20, 2022
"जे घरात झोपून राहतात, घरकोंबडे आहेत, ते जनतेत राहतील कसे?"
"वरळीच्या आमदारांनी मराठी साहित्य, संस्कृती, लोककला याबाबत केलेला एक कार्यक्रम दाखवावा. जे घरात झोपून राहतात, घरकोंबडे आहेत, ते जनतेत राहतील कसे? वरळीत आदित्य ठाकरे आता आले आहेत. त्यांचा अभ्यास कच्चा आहे. पूर्वी वरळीत दत्तात्रय राणे आमदार होते, हे त्यांना माहीत नसावे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात शेजाऱ्यानेच न्यायालयात केलेली याचिका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात मराठी माणूस आणि मुंबईकरांनी केलेले बंड आहे" असंही शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या विरोधात शेजाऱ्यानेच न्यायालयात केलेली याचिका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात मराठी माणूस आणि मुंबईकरांनी केलेले बंड आहे. @OfficeofUT@AUThackeray@BJP4Mumbai@BJP4Maharashtrapic.twitter.com/cmrgXTen9M
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 20, 2022