Ashish Shelar : “पेंग्विन सेनेचा दसरा... शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला?”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 02:13 PM2022-10-02T14:13:49+5:302022-10-02T14:23:14+5:30
BJP Ashish Shelar And Shivsena : भाजपाने दसरा मेळाव्यावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पेंग्विन सेनेचा दसरा... शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला?” असं म्हणत बोचरी टीका केली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरू झाली असून पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. याच दरम्यान आता भाजपाने दसरा मेळाव्यावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“पेंग्विन सेनेचा दसरा... शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला?” असं म्हणत बोचरी टीका केली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला डिवचलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेचे साथ, दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात!” असं म्हणत शेलारांनी खोचक टोलाही लगावला आहे.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 2, 2022
“काय तो पेंग्विन सेनेचा दसरा…”
“काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेचे साथ, दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात!, सगळा गोंधळ घालून बघा घड्याळ कसे नामानिराळे संसार तिघांचा प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले. काय तो भारतजोडो…काय तो पेंग्विन सेनेचा दसरा… शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला? सगळं कसं ok मध्ये आहे”असं आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"दसरा मेळावा, काय सत्य... महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?"
भाजपाचे नेते राम कदम (BJP Ram Kadam) यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "महत्वपूर्ण... दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कचे मैदान भरावे म्हणून पेंग्विन सेनेने मागितली राष्ट्रवादी तथा काँग्रेसकडे मदत... आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरणार शिवाजीपार्क मैदान... काय सत्य? महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते" असं राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"