Ashish Shelar : "ज्यांना मुंबईतील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 02:04 PM2022-09-28T14:04:04+5:302022-09-28T14:14:32+5:30

BJP Ashish Shelar Slams Shivsena : "पेंग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार!" असं म्हणत शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray And Uddhav Thackeray | Ashish Shelar : "ज्यांना मुंबईतील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे"

Ashish Shelar : "ज्यांना मुंबईतील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे"

googlenewsNext

भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि आदित्य ठाकरेंवर (Shivsena Aaditya Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. "ज्यांना मुंबईतील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "शिंदे-फडणवीस सरकारने हे विधेयक मागे घेऊन विद्यापीठांचे संभाव्य राजकीयकरण थांबवले" असं ही म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  

"पेंग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार!" असं म्हणत शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. आशिष शेलार यांनी "विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपालांना असलेले अधिकार काढून ते शिक्षण मंत्र्यांना देण्याच्या राजकीय निर्णयाला समाजातील प्रत्येक स्तरातून प्रचंड विरोध असतानाही ठाकरे सरकारने अट्टाहासाने ते विधेयक मंजूर केले होते. आम्ही त्याला सभागृहात आणि बाहेरही कडाडून विरोध केला होता" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"पेंग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार"

"शिंदे-फडणवीस सरकारने हे विधेयक मागे घेऊन विद्यापीठांचे संभाव्य राजकीयकरण थांबवले! विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान रोखले. पेंग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार! ज्यांना मुंबईतील रस्त्यावरील बुजवता येत नाही खड्डे त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे!" असं देखील शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शेलार यांनी याआधीही वेदांत-फॉक्सकॉनवरून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. 

"अडीच वर्षे कंपनीला का लटकवले?"

"ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात वेदांत -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला... हा घ्या सरकारी पुरावा. प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडीच वर्षे कंपनीला का लटकवले? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरू होत्या का? चौकशी झालीच पाहिजे!" असं शेलार यांनी म्हटलं आहे. 

"आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी"

"या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी! चौकशीला समोरे जा... अजून बरेच निघेल! अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करू नये?" असं देखील आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  याआधी देखील शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. आमची रोखठोक सच्चाई असं म्हणत शिवसेनेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे. 

Web Title: BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray And Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.