Ashish Shelar : "तरुणांची माथी भडकवणाऱ्या आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा..."; भाजपा आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:08 PM2022-09-27T12:08:29+5:302022-09-27T12:15:53+5:30
BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray : भाजपाने शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
वेदांत-फॉक्सकॉनवरून सध्या राज्यामध्ये राजकारण तापलं आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच दरम्यान आता भाजपानेशिवसेना आणि आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडीच वर्षे कंपनीला का लटकवले? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरू होत्या का?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी" असंही म्हटलं आहे.
भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी वेदांत-फॉक्सकॉनवरून आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात वेदांत -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला... हा घ्या सरकारी पुरावा. प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडीच वर्षे कंपनीला का लटकवले? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरू होत्या का? चौकशी झालीच पाहिजे!" असं शेलार यांनी म्हटलं आहे.
ठाकरे सरकारच्या अडिच वर्षांच्या काळात वेदांत -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला...हा घ्या सरकारी पुरावा
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 27, 2022
प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता?
अडिच वर्षे कंपनीला का लटकवले?
टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरु होत्या का?
चौकशी झालीच पाहिजे!
1/2 pic.twitter.com/aMXYhVPxqJ
"आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी"
"या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी! चौकशीला समोरे जा... अजून बरेच निघेल! अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करू नये?" असं देखील आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी देखील शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. आमची रोखठोक सच्चाई असं म्हणत शिवसेनेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे.
या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 27, 2022
चौकशीला समोरे जा...अजून बरेच निघेल!
अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करु नये?
2/
"पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली..."
"पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली... आयना का बायना... घेतल्याशिवाय जायना असे वागणाऱ्यांकडून सगळ्या टक्केवारीचा हिशेब मुंबईकरच मागत आहेत... हसीना पारकर सोबत देवाणघेवाण, कसाबला बिर्याणी, याकूबच्या कबरीवर रोषणाई करणारे आता म्हणे, भाजपाचा कोथळा काढणार? वा रे वा!" असं म्हणत बोचरी टीका केली आहे.
"मुंबईसह महाराष्ट्र फडणवीसांच्या पाठीशी"
"फडणवीसांसमोरील आव्हानांची सामनाच्या अग्रलेखातून पेग्विन सेनेने चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रासमोरील आव्हाने काय आहेत याची पूर्ण कल्पना असलेले देवेंद्र फडणवीस हे नेते आहेत ते आव्हांनाना निढळ्या छातीने सामोरे जातात... घरात बसून राहत नाहीत. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र फडणवीसांच्या पाठीशी आहे... सामनाच्या अग्रलेखात आता पेग्विन सेनेसमोरील आव्हानांची जाहीर चर्चा करा... आज त्याची गरज आहे" असं शेलार यांनी म्हटलं आहे.