Ashish Shelar : "तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय..."; गोल्डन गँगवरून आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:55 PM2023-02-13T12:55:03+5:302023-02-13T13:08:50+5:30
BJP Ashish Shelar : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी गोल्डन गँगवरून खोचक टोला लगावला आहे.
सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. "पंतप्रधान मोदी छातीवर मूठ मारून जे सांगतात की, ‘‘मैं अकेला लढ रहा हूं और सबको भारी पड रहा हूं.’’ हे काही खरे नाही. विरोधकांच्या अंगावर फेकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे साप, विंचू, मगरी वगैरे त्यांनी पाळून ठेवले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"याकुब, नवाब, हसीना पारकर, सरदार शहावली खान ही तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय. पंतप्रधान बोलले त्याची एवढी सुपारी लागली?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी गोल्डन गँगवरून खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आजच्या सामनाच्या अग्रलेखातून बरिच "ऍसिडिटी" फ्लश झालेय! होऊ दे एकदम साफ!!" असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
तपास यंत्रणा यांना आता विंचू, मगरी सारख्या वाटतात, पण 25 वर्षे मुंबईकरांचे रक्त शोषून भ्रष्टाचार केलात त्याचे काय?
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 13, 2023
कुठल्या गोल्डन गँग विषयी इशारे करताय?
याकुब,नवाब, हसीना पारकर, सरदार शहावली खान ही तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय.
पंतप्रधान बोलले त्याची एवढी सुपारी लागली?
1/2
"तपास यंत्रणा यांना आता विंचू, मगरी सारख्या वाटतात, पण 25 वर्षे मुंबईकरांचे रक्त शोषून भ्रष्टाचार केलात त्याचे काय? कुठल्या गोल्डन गँग विषयी इशारे करताय? याकुब, नवाब, हसीना पारकर, सरदार शहावली खान ही तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय. पंतप्रधान बोलले त्याची एवढी सुपारी लागली?" असं म्हणत आशिष शेलारांनी टीका केली आहे.
"होय! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छातीठोकपणे सांगितले, 'एक अकेला कितनों पर भारी है...!' हे शब्द काही जणांसाठी "धौतीयोग"सारखे लागलेत. ज्यांना ही "मात्रा" लागू पडली त्यांना मळमळ, जळजळ होणारच! आजच्या सामनाच्या अग्रलेखातून बरिच "ऍसिडिटी" फ्लश झालेय! होऊ दे एकदम साफ!!" असंही म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"