Ashish Shelar : "पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली..."; आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 03:11 PM2022-09-22T15:11:20+5:302022-09-22T15:21:17+5:30

BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray : आमची रोखठोक सच्चाई असं म्हणत शिवसेनेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये विविध मुद्दयांवरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray Over so many issues in mumbai | Ashish Shelar : "पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली..."; आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका 

Ashish Shelar : "पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली..."; आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका 

Next

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. आमची रोखठोक सच्चाई असं म्हणत शिवसेनेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये विविध मुद्दयांवरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. "पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली... आयना का बायना... घेतल्याशिवाय जायना असे वागणाऱ्यांकडून सगळ्या टक्केवारीचा हिशेब मुंबईकरच मागत आहेत... हसीना पारकर सोबत देवाणघेवाण, कसाबला बिर्याणी, याकूबच्या कबरीवर रोषणाई करणारे आता म्हणे, भाजपाचा कोथळा काढणार? वा रे वा!" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. 

आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "होय, मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान स्विकारले!! पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली! भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेस सोबत सलगी आणि शिवसेनेला संपवून स्वतः वाढणाऱ्या राष्ट्रवादी सोबत अती प्रेमाचे उमाळे यामुळे स्वपक्षातील लढवय्ये मोहरे पक्ष सोडून गेले. महाराष्ट्र हातून गेला, आता मुंबईकरांचे हातून मुंबई काढून घेणार याची चाहूल लागली. त्यामुळे तेलही गेले आणि तुपही गेले हाती 'धुपाटणे फक्त शिल्लक राहण्याची वेळ आली अशी अवस्था पेंग्विन सेनेची झाली आहे."

"मुंबईसह महाराष्ट्र फडणवीसांच्या पाठीशी"

"फडणवीसांसमोरील आव्हानांची सामनाच्या अग्रलेखातून पेग्विन सेनेने चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रासमोरील आव्हाने काय आहेत याची पूर्ण कल्पना असलेले देवेंद्र फडणवीस हे नेते आहेत ते आव्हांनाना निढळ्या छातीने सामोरे जातात... घरात बसून राहत नाहीत. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र फडणवीसांच्या पाठीशी आहे... सामनाच्या अग्रलेखात आता पेग्विन सेनेसमोरील आव्हानांची जाहीर चर्चा करा... आज त्याची गरज आहे" असं शेलार यांनी म्हटलं आहे. 


 
"बुलेट ट्रेनला विरोध करणारे, 44 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणणाऱ्या नाणार प्रकल्पाला विरोध करणारे, 1 लाख कोटींची गुंतवणूक आणणाऱ्या जैतापूर प्रकल्पालाही विरोध करणारे, मेट्रो पासून कोस्टल रोड पर्यंत आणि मुंबईत पर्यावरणपूरक एलईडी दिवे लावताना सुध्दा विरोध, विरोध आणि विरोधाचा झेंडा फडकवणारी पेंग्विन सेना आज फॉक्सकॉन आणि वेदांताच्या नावाने गळे काढत आहेत."

"आयना का बायना...घेतल्याशिवाय जायना"

"आयना का बायना...घेतल्याशिवाय जायना असे वागणाऱ्यांकडून सगळ्या टक्केवारीचा हिशेब मुंबईकरच मागत आहेत... मागणारच! 25 वर्षात 21 हजार कोटी खर्च करून मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे कसे? द्या हिशेब... 45 हजार कोटीचा अर्थसंकल्प कुठे खर्च होतो..? द्या हिशेब फॉक्सकॉन आणि वेदांताकडून किती मागितले? 10% कि त्यापेक्षा जास्त.....होय, आम्ही टक्केवारी वाढवू मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी वाढायला प्रयत्न करू ... पालिकेच्या मराठी शाळांची टक्केवारी वाढवू... तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा मराठी माणसासाठी किती "टक्के " काम केलेत त्याचा हिशेब द्या!"

"याकूबच्या कबरीवर रोषणाई करणारे आता म्हणे, भाजपाचा कोथळा काढणार?"

"होय, आम्ही टक्केवारी वाढवू मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी वाढायला प्रयत्न करू... पालिकेच्या मराठी शाळांची टक्केवारी वाढवू. तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा मराठी माणसासाठी किती टक्के " काम केलेत त्याचा हिशेब द्या! हसीना पारकर सोबत देवाणघेवाण, कसाबला बिर्याणी, याकूबच्या कबरीवर रोषणाई करणारे आता म्हणे, भाजपाचा कोथळा काढणार? वा रे वा! कसाब तुम्हाला खंजीर देऊन गेलाय की काय? भाजपाचा राजकीय कोथळा काढायला? ही औरंगजेबी भाषा आपल्या तोंडी शोभते का? स्वतः मुख्यमंत्री होतात तेव्हा का निवडणूक लगेचच घेतल्या नाहीत? आणि आज आम्हाला काय सांगताय लगेच निवडणूक घ्या... आम्ही तयार आहोत...तुमच्याकडे हुवा धनुष्यबाण तरी हातात आहे का?" असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray Over so many issues in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.