Ashish Shelar : "हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?"; भाजपाचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 02:01 PM2022-03-29T14:01:07+5:302022-03-29T14:18:38+5:30

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government : हिंदू नववर्षाच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती.

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Gudi Padwa Shobha Yatra | Ashish Shelar : "हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?"; भाजपाचं टीकास्त्र

Ashish Shelar : "हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?"; भाजपाचं टीकास्त्र

googlenewsNext

मुंबई - हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या (Thackeray Government) हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी आज पुन्‍हा एकदा सरकारवर तोफ डागली. हिंदू नववर्षाच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्‍यावेळापासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्पष्‍ट सूचना आल्‍या नाहीत. त्‍यामुळे आज इलेक्‍ट्रॉनिक मीडियाशी बोलताना शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. 

ते म्‍हणाले की, ठाकरे सरकारने गुढीपाडव्‍या शोभायात्रा  आणि राम नवमीच्‍या मिरवणूकांना परवानगी देण्‍याची स्‍पष्‍ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्‍यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. ज्‍या ज्‍या वेळी हिंदू सणांचा विषय येतो त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो? असा सवाल त्‍यांनी केला. तसेच मुंबई पोलिसांनी मुंबईत 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश  दिले असून त्‍यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्‍ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्‍ला करतील अशी माहिती पोलिसांकडे आल्‍याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्‍याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्‍यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कलम लावण्‍यात आले आहे.

मात्र याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. म्‍हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो? आणि रामभक्‍तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते? असा सवाल करीत आशिष शेलार यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोन्‍ही सणांना परवानगी देण्‍यात याव्‍यात. या कार्यक्रमात खोडा टाकू नये आम्‍ही  या मंडळ व समित्‍यांसोबत चर्चा करीत असून या उत्‍सवात भाजपा सहभागी होईल, असेही आमदार शेलार यांनी आज जाहीर केले.

Web Title: BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Gudi Padwa Shobha Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.