"उद्धव ठाकरेंसारखा अहंकारी नेता झाला नाही..."; आशिष शेलारांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 06:00 PM2024-01-17T18:00:01+5:302024-01-17T18:08:36+5:30

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray And Sanjay Raut Over Press | "उद्धव ठाकरेंसारखा अहंकारी नेता झाला नाही..."; आशिष शेलारांची खोचक टीका

"उद्धव ठाकरेंसारखा अहंकारी नेता झाला नाही..."; आशिष शेलारांची खोचक टीका

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे."उद्धव ठाकरे यांच्यासारखा अहंकारी नेता या राज्यांमध्ये कधी न झाला ना कधी होईल, स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरा कुठलाही विचार सुचत नाही" असं म्हणत खोचक टीका केली आहे. तसेच "ज्यांना राजकीयदृष्ट्या हे राम म्हणण्याची वेळ आली आहे त्यांच्या आवाजात न बळ आहे ना त्यात तथ्य आहे" असंही म्हटलं आहे. 

"जो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेला त्यांची वाताहत करण्याचे काम उबाठा गटाने केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा अहंकारी नेता या राज्यांमध्ये कधी न झाला ना कधी होईल. ज्यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरा कुठलाही विचार सुचत नाही. अगदी मित्र पक्षाचाही विचार सुचत नाही. याचा अनुभव आम्ही घेतला आहे. आता काँग्रेसला तो फटका बसत आहे. याबद्दल मिलिंद देवरा यांनी वाच्यता केली आहे. आता उरल्या-सुरल्या काँग्रेसची धूळधाण उद्धव ठाकरे करतील हे महाराष्ट्र बघेल."

"राजकीयदृष्ट्या हे राम म्हणण्याची वेळ"

"ज्यांना राजकीयदृष्ट्या हे राम म्हणण्याची वेळ आली आहे त्यांच्या आवाजात न बळ आहे ना त्यात तथ्य आहे. भगवान रामाबद्दल जेवढा अपमान संजय राऊत यांनी केला तेवढा अपमान आयएसआय संघटनेच्या लोकांनी केला की, नाही हा प्रश्न आहे. राम वर्गणीच्या बाबतीत संजय राऊत यांनी कुचेष्टा केली. राम मंदिराच्या जागेबाबत वाद निर्माण केला. रामसेतूवर प्रश्न करणाऱ्यांबरोबर सलगी केली. राम भक्तांवर गोळ्या मारणाऱ्याबरोबर हात मिळवणी केली. राम भक्ताच्या खुनाचे रक्त संजय राऊत यांच्या पक्षाच्या हाताला लागले आहे. आता भगवान रामाला एका पक्षामध्ये बांधण्याचे काम तेच करत आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांना हे राम म्हणण्याची वेळ आली आहे. संजय राऊत यांच्या पत्रकारितेची डिग्री तपासली पाहिजे" असं म्हणत आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे.

"महायुतीतील सर्व सहा जागा जिंकू"

"महायुतीतील सर्व सहा जागा जिंकून आणण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे. आम्ही त्याचा आढावा घेऊन योजना बांधत आहोत. नियोजन करत आहोत. बूथ स्तरावर गट स्तरावर, समाज वर्ग स्तरावर, भाषावर वर्ग स्तरावर  त्याबद्दलची योजना आणि आखणी करत आहोत. तीन लोकसभेचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या तीन लोकसभांचे काम आज पूर्ण झालेले आहे. सहाही लोकसभा आम्ही जिंकू" असा आशावाद शेलार यांनी व्यक्त केला.

"फिल्मफेअरचे कार्यक्रम देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. ती काही सरकारी योजना नाही. सरकार त्यावर जीआर काढून नियम करते अशी भूमिका नाही. त्यासाठी सबसिडी सरकार देत नाही. त्यांच्या सोयीने हा एका वर्तमानपत्राच्या विभागाचा विषय आहे. त्यामुळे त्या वर्तमानपत्राच्या मालकाला ते विचारा. वडेट्टीवार यांनी अडीच वर्षांमध्ये त्यांचे सरकार असताना जे काही वाढून ठेवले आहे त्यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर त्यांनी कधीतरी भाष्य करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाबद्दल कोणी बोलत असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे" असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray And Sanjay Raut Over Press

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.