Ashish Shelar : "माझं कुटुंब माझी जबाबदारी; माझा पक्ष माझी कन्या भाग्यशाली"; भाजपाचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:56 AM2023-07-15T10:56:04+5:302023-07-15T11:05:00+5:30
BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.
राज्याच्या राजकारणात गेल्या आठवड्यात मोठा राजकीय भूकंप घडला. त्यात अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडत थेट शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सहभागी झाल्याचा दावा अजित पवारांकडून करण्यात आला. अजित पवार आणि इतर नेत्यांनी उचललेल्या पाऊलाने राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. याच दरम्यान भाजपाने हल्लाबोल केला आहे.
"माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझा पक्ष माझी कन्या भाग्यशाली" असं म्हणत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. "राजकीय पटलावर भाजपाने नारा बदलला आता "छोट कुटुंब सुखी कुटुंब" नाही तर भाजपाचा नारा स्पष्ट...मोठ कुटुंब सुखी कुटुंब!!" असं म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
◆ज्यांचा नारा आमचा पक्ष आमचेच वर्षानुवर्षे घराणे..।
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 14, 2023
ज्यांचा नारा "माझ कुटुंब माझी जबाबदारी"
◆ज्यांचा नारा "माझा पक्ष माझी कन्या भाग्यशाली"
◆ या सगळ्यांना देशहितासाठी, तरुणांना संधी देण्यासाठी कधीतरी छेद देण्याची गरज होती.
म्हणून राजकीय पटलावर भाजपाने नारा बदलला
आता "छोट…
"ज्यांचा नारा आमचा पक्ष आमचेच वर्षानुवर्षे घराणे...
ज्यांचा नारा "माझ कुटुंब माझी जबाबदारी"
ज्यांचा नारा "माझा पक्ष माझी कन्या भाग्यशाली"
या सगळ्यांना देशहितासाठी, तरुणांना संधी देण्यासाठी कधीतरी छेद देण्याची गरज होती.
म्हणून राजकीय पटलावर भाजपाने नारा बदलला
आता "छोट कुटुंब सुखी कुटुंब" नाही तर
भाजपाचा नारा स्पष्ट...
मोठ कुटुंब सुखी कुटुंब!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आले असता नागपुरात आयोजित सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले असून भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. नागपुरात भाजपा कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं"जे "मी आणि माझं कुटुंब" एवढंच जगतात थोडक्यात काय तर जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात!" असं म्हणत निशाणा साधला होता. तसेच "जे नाल्यातील गाळ खातात, कोविडमध्ये सुध्दा भ्रष्टाचार करतात, गरिबांच्या पोरांच्या दप्तर, पाटी पेन्सिल मध्ये पण कट कमिशन खातात" असं म्हणत हल्लाबोल केला होता.