Ashish Shelar : "...तर श्रद्धा वाचली असती, गोलमाल है, चौकशी व्हायलाच हवी"; आशिष शेलारांनी विचारले 'हे' प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 06:36 PM2022-11-23T18:36:44+5:302022-11-23T18:43:27+5:30

BJP Ashish Shelar : १९ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली असल्याचे समोर आले आहे. यावर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे.

BJP Ashish Shelar statement Over Shraddha Walker Murder Case | Ashish Shelar : "...तर श्रद्धा वाचली असती, गोलमाल है, चौकशी व्हायलाच हवी"; आशिष शेलारांनी विचारले 'हे' प्रश्न

Ashish Shelar : "...तर श्रद्धा वाचली असती, गोलमाल है, चौकशी व्हायलाच हवी"; आशिष शेलारांनी विचारले 'हे' प्रश्न

googlenewsNext

लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला दिल्ली कोर्टाने  मंगळवारी चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देत त्याच्या पॉलिग्राफ चाचणीस परवानगी दिली. श्रद्धा आणि आफताब यांचे सुरुवातीपासूनच भांडणं सुरु होती. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. आफताब हा गळा दाबून मारहाण करत असल्याची तक्रार श्रद्धाने नालासोपारा पूर्वमधील तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र १९ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली असल्याचे समोर आले आहे. यावर आता भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी भाष्य केले आहे. 

तत्कालीन पोलीस आणि सरकारने कडक कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती असं म्हटलं आहे. तसेच "दखलपात्र गुन्हा अदखलपात्र करुन हा विषय "टेबलावर" मिटवण्यात आला का?, तक्रार मागे घेण्यासाठी श्रद्धावर दबाव आणला गेला का?" असे सवालही शेलार य़ांनी विचारले आहेत. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी  लिहिलेल्या पत्रानुसार तिच्या जीवाला धोका असून तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. महाराष्ट्र पोलिसांनी या पत्राची दखल का घेतली नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता का?"

"सरकारमध्ये बसलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थन होते म्हणून? की या सर्व प्रकारावर पांघरूण घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज आहे. तत्कालीन पोलीस आणि सरकारने कडक कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती. माझी पोलिसांना विनंती आहे की, हे पत्र दाबण्यात आले का? याची चौकशी दडपण्यात आली का? आफताबवर कारवाई होऊ नये याबाबत कुणाचे दडपण होते का? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे" असं आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"श्रध्दा वालकरने महाराष्ट्र पोलिसांना दिलेल्या पत्रावर आता पोलीस आम्ही दोन्ही कुटुंबांना बोलावून समज दिली असेही सांगू शकतात. म्हणून आमचे काही प्रश्न
1) दखलपात्र गुन्हा अदखलपात्र करुन हा विषय "टेबलावर" मिटवण्यात आला का?
2) तक्रार मागे घेण्यासाठी श्रध्दावर दबाव आणला गेला का?
3) गंभीर गुन्हा घडू शकतो याची स्पष्ट कल्पना पीडिता देत असल्याने गुन्हा दाखल करुनच चौकशी का केली नाही?
4) प्रकरण दाबले तर त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानंतर पोलिसांनी नजर का ठेवली नाही?
5) हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांवर कुणाचा दबाव होता का?
6) तक्रारीचा दखल घेण्यासाठी एक महिन्याचा विलंब का झाला?
7) पोलिसांनी दोन्ही कुटुंबाकडून जे लेखी घेतले त्यामध्ये तारखांची खाडाखोड का? श्रद्धाच्या खूनानंतर तत्कालीन सत्ताधारी पक्षांनी निषेध का केला नाही? गोलमाल है...म्हणून चौकशी व्हायलाच हवी!" असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: BJP Ashish Shelar statement Over Shraddha Walker Murder Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.